Tarun Bharat

किल्ला तलाव विकासासाठी 7 कोटींची योजना

प्रतिनिधी/ बेळगाव

येथील भुईकोट किल्ला परिसराचा स्मार्ट सिटी योजनेतून विकास करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र सदर प्रस्ताव सध्या संरक्षण खात्याच्या परवानगी प्रक्रियेत अडकला आहे. मात्र किल्ला तलावाच्या सौंदर्यीकरण आणि विकास प्रकल्पासाठी 7 कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या दोन टप्प्यांसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

किल्ला तलाव सौंदर्यीकरण आणि विकास योजनेमध्ये विविध प्रकारची विकसकामे राबविली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने तलावाची जलसंवर्धन योजना, बाजुच्या भिंतीचे बांधकाम, सुरक्षा फाटकांची व्यवस्था, विद्युत व्यवस्था यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील योजनेमध्ये होणाऱया कामांचे कंत्राट क्लासिक ट्रेडर्स या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे.

तसेच दुसऱया टप्प्यातील कामांचे कंत्राट सौहार्दा इन्फ्राटेक (प्रा.) लिमीटेड या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. यामध्ये सुशोभिकरण टप्प्यातील कामे, कारंजे निर्मिती, स्वच्छताविषयक व्यवसायांचा समावेश आहे. 

Related Stories

के. आर. शेट्टी किंग्स, ऍडव्होकेट पाटील लायन्स संघ विजयी

Amit Kulkarni

घर झाडण्यासाठी येऊन मंगळसूत्र पळविणाऱया महिलेला अटक

Patil_p

हमारा देश संघटनेतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन

Omkar B

पुरासंदर्भात प्रथमच काळजी घ्या!

Patil_p

युवकाच्या खून प्रकरणी चौकडीला अटक

Patil_p

खानापूर कॉलेज बॉईज क्रिकेट स्पर्धेत करंबळ धोंडदेव संघ विजेता

Amit Kulkarni