Tarun Bharat

किल्ले सज्जनगड बुरुज स्वच्छता मोहीम फत्ते

वार्ताहर/ परळी


आपण लहान असताना दिवाळी आली की आपल्या दारात किल्ले बनवायचो. आपला किल्ला इतरांपेक्षा कसा उठावदार आणि वेगळा आणि सुटसुटीत असावा यासाठी जीव की प्राण करायचो परंतु आता परिस्थिती थोडी वेगळी आहे बहुतांश गड-किल्ले हे दुरावस्थेत दिसून येत आहेत. त्यामुळे परळी खोर्‍यातील मावळ्यांनी सज्जनगड येथील बुरुजाची स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम आखला.

जवळपास 50 मावळ्यांनी सज्जनगड येथील बुरुजाची तसेच आसपासच्या परिसराची स्वच्छता मोहीम फत्ते केली. तसेच ह्या दिवाळीत छोटे गड किल्ले तयार करण्यापेक्षा आपल्या आसपासच्या ऐतिहासिक गड किल्ल्यांचा संवर्धनाचा संदेश या माध्यमातून परळी खोऱ्यातील या पन्नास मावळ्यांनी दिला आहे. यावेळी पावसाळ्यात आलेल्या बुरुजा शेजारील गवताची स्वच्छता तसेच बुरुजावर असलेल्या झाडांमुळे बुरुज कमकुवत होत असल्याने तीही झाडे तोडण्यात आली.

Related Stories

सातारा : दहिवडी वन परिक्षेत्राचा वनपाल 10 हजाराची लाच घेताना जाळ्यात

Archana Banage

Karnataka Election : काँग्रेस सत्तेवर आल्यास मोफत वीज, रेशन, बेरोजगारी भत्ता देणार- राहुल गांधी

Abhijeet Khandekar

रस्ते खुदाईवरुन सत्ताधारी गटातच ठिणगी

Archana Banage

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात २५ टक्क्यांची वाढ

datta jadhav

”अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता”

Archana Banage

गावचे कारभारी ठरले चिट्टीवर

Patil_p
error: Content is protected !!