Tarun Bharat

किशोर धुमाळ एलसीबीचे नवे कारभारी

प्रतिनिधी/ सातारा

सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळणे हे मोठी बाब समजली जाते. मात्र, त्यासाठी अनुभव, गुन्हय़ांची उकल करण्याची पध्दत व तपास यंत्रणा गतिमान करण्याचे कौशल्य असावेच लागते. तत्कालीन पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या बदलीनंतर एलसीबीचे निरीक्षकपद रिक्त होते. त्यावर नक्की कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चाही घडत होत्या. सोमवारी अचानक कराडला तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांची नियुक्ती झाली आहे. 

पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ गेल्या काही वर्षांपासून सातारा जिल्हय़ात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये देखील काम केले असून त्यानंतर नक्षलवादी भागातील गोंदिया जिल्हय़ातही त्यांनी सेवा बजावलीय. तेथून त्यांना सातारा जिल्हय़ात काम करण्याची संधी मिळाली. सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना ते चांगलेच चर्चेत होते. टोलनाक्यावरुन दोन्ही राजे व त्यांच्यातील कार्यकर्त्यांमधील वादातून निर्माण झालेली गोंधळाची स्थिती सावरण्यात त्यांनी चांगली भूमिका बजावली.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या निवासस्थानी सुरुचीवरील राडय़ावेळी दोन्ही गट एकमेकांना भिडू नयेत प्रंटवर राहून शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सातारकरांनी पाहिले आहेत. आता विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या महिन्यापासून रिक्त असलेले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या निरीक्षकपदी किशोर धुमाळ यांची नियुक्त झाली आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या कार्यकाळात सुरवातीला विजय कुंभार यांनी एलसीबीचे काम पाहिले. परंतु काही काळातच त्यांच्याऐवजी सर्जेराव पाटील यांच्याकडे पदभार देण्यात आला. अजयुकमार बन्सल यांनी पोलीस अधीक्षकपद स्वीकारल्यानंतर सर्जेराव पाटील सोलापूरला गेले. जिह्यातील महत्त्वाचे असे हे पद मिळण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले.  

कामकाजाला गती देण्याचे काम करावे लागणार

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे एलसीबीच्या निरीक्षकांची निवडही लांबणीवर पडली होती. या निवडणुकीसाठी लागलेल्या आचारसंहितेची मुदतही संपली आहे. त्यामुळे निरीक्षकांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार अधिक्षकांनी तातडीने निर्णय घेत एलसीबीचे निरीक्षक म्हणून किशोर धुमाळ यांची नियुक्ती केली आहे. गेल्या महिन्यापासून रखडलेल्या एलसीबीच्या कामकाजाला गती देण्याचे काम धुमाळ यांना करावे लागणार आहे.

Related Stories

प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेचा फेरविचार करावा : समरजितसिंह घाटगे

Archana Banage

ठाकरे सरकारचे ‘या’ मागणीसाठी रेल्वेला विनंती पत्र

Tousif Mujawar

1 कोटी 80 लाखाच्या कोकेन बाळगल्याप्रकरणी परदेशी नागरिकास अटक

Archana Banage

‘पतंगें’ची दादागिरी थांबणार कधी?

datta jadhav

मतदारयादी पुनर्परीक्षण कार्यक्रमास 9 नोव्हेंबरपासून प्रारंभ

datta jadhav

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट : मंगळवारी 60,212 नवे रुग्ण

Tousif Mujawar