Tarun Bharat

किश्तवाडमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार

सुरक्षा दलाची कारवाई, एसपीओवरील हल्ल्यात होते सामील

वृत्तसंस्था/ जम्मू

जम्मू काश्मीरमधील किश्तवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. गेल्या आठवडय़ामध्ये याच दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक एसपीओ हुतात्मा तर एक जवान गंभीर जखमी झाला होता. त्यांचा खात्मा करुन सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

या दोघांची ओळख पटली असून बशारत अहमद आणि आशिक हुसेन अशी त्यांची नावे आहेत. हुसेन हा बलात्कार प्रकरणातील आरोपी असून बशारत हा एका आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्याचा भाऊ आहे.

सुरक्षा दलाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार अद्यापही ही चकमक सुरु आहे. चार दिवसांपूर्वी याच दोन दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर पोलिसांच्या दोन एसपीओवर हल्ला केला होता. यामध्ये एक हुतात्मा झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर ते दहशतवादी त्यांची हत्यारे घेऊन जंगलात पळून गेले होते.तेव्हापासून या परिसरात शोध अभियान सुरु होते. शुक्रवारी सकाळी किश्तवाड परिसरातील जंगलात त्यांचा सुगावा लागल्यानंतर संपूर्ण परिसर सैनिकांनी घेरला. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देत दोघांनाही ठार मारले. या कारवाईत जम्मू काश्मीर पोलिसांबरोबर 17 राष्ट्रीय रायफल्सचे जवानही सहभागी झाले होते.

Related Stories

ड्रग्ज प्रकरण : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले…

Tousif Mujawar

”श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको पण गरीब मराठ्यांना द्या”

Archana Banage

कार्यकारी अभियंता धेंगेंच्या कार्यमुक्ती आदेशाला स्थगिती

Abhijeet Khandekar

”देवेंद्र फडणवीसांचे केंद्रात वजन असेल तर…”

Archana Banage

देशात 59.68 लाख करदात्यांना मिळाला 1.40 लाख कोटींचा परतावा

datta jadhav

ऍमेझॉन’ला 200 कोटी दंड भरावा लागणार

Patil_p