Tarun Bharat

किश्तवाडमध्ये दहशतवादी अड्डा उध्वस्त; 25 जिलेटीन कांड्या हस्तगत

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमधील दहशतवादी अड्डा जम्मू पोलिसांनी उध्वस्त केला. त्या ठिकाणावरील 25 जिलेटीन स्टिक्स, 3 डिटोनेटर पिन, दोन पिशव्या आणि इतर आक्षेपार्ह साहित्य ताब्यात घेतले आहे. 

किश्तवाड जिल्ह्यातील दुल जंगल परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जम्मू पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. शोधमोहिमेदरम्याम, पोलिसांनी दहशतवाद्यांचा एक छुपा अड्डा उध्वस्त केला. तसेच त्याठिकाणावरील जिलेटीनच्या 200 ग्रॅम वजनाच्या 18 कांड्या तर 390 ग्रॅम वजनाच्या 7 कांड्या हस्तगत केल्या. तसेच तेथील काही आक्षेपार्ह साहित्यही ताब्यात घेतले. जम्मू पोलीस याबाबाबत अधिक तपास करत आहेत.

Related Stories

संभाजीराजेंसोबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाची बैठक सुरू, राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा सुटणार

datta jadhav

गुरु तेजबहादूरसिंगांचा त्याग आजही प्रेरणादायी

Amit Kulkarni

अनिल देशमुख यांच्यावर ईडीची मोठी कारवाई ; कोट्यावधी रुपयांची संपत्ती जप्त

Archana Banage

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने गाठला 15 लाखाचा टप्पा

datta jadhav

माजी पंतप्रधान राजीव गांधींची जयंती; वीरभूमीवर जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधींनी केले अभिवादन

Tousif Mujawar

अभिनेत्री कंगना रणावतला पुन्हा समन्स

Omkar B