Tarun Bharat

‘किसनवीर’च्या स्थितीवरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हय़ात सध्या कोरोना स्थिती आटोक्यात येत असल्याने जगरहाटीने गती घेतली असताना पाच साखर कारखाने साखर आयुक्तांनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये किसनवीर साखर कारखानाही असल्याने त्यावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी बुधवारी झडल्या. यावेळी मदनदादा भोसले यांनी आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांच्यावर आरोप केला तर पूर्वीचे मदनदादांचे सहकारी असलेल्यांनी काँग्रेसजनांनी त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडत दिवस गाजवला.

साताऱयात पत्रकार परिषद घेवून किसनवीर साखर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले यांनी गेल्या तीन वर्षापासून कारखाना अडचणींचा सामना करतो आहे. हेच दिवस राहत नाहीत असे सांगत किसनवीरची एफआरपी देणे दिलेले नाही. ती देणार आहे. मध्यंतरी काही मंडळींनी कारखान्यावर आठशे ते हजार कोटींचे कर्ज आहे अशी आवई उठवली. कारखान्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशा वावडय़ा उठवणाऱया मंडळींनी ते हजार कोटींचे कर्ज असल्याचे दाखवून द्यावे मी राजकीय आणि सामाजिक जीवनातून संन्यास घेईन, असे चॅलेज विरोधकांना त्यांनी दिले. तर आमदार मकरंद पाटील आणि त्यांचे बंधू नितीन पाटील यांना सहकाराशी काही घेणेदेणे नाही ना शेतकऱयांशी असाही आरोप केला.

त्यानंतर पाटील बंधुंकडून उत्तर अपेक्षित असताना साताऱयातच मदनदादा भोसले यांचे जुने सहकारी असलेल्या बाबूराव शिंदे, राजेंद्र शेलार, बाबासाहेब कदम, धर्मराज जगदाळे यांनी साताऱयात पत्रकार परिषद घेवून सहकार खात्याने कलम 83 अन्वये केलेल्या चौकशीतून एकूणच कारभारावर ओढलेले ताशेरे आणि व्यक्त केलेला गैरव्यवहाराचा संशय, चालू हंगामात कारखाना सुरू होण्याबाबत आणि सुरू झाला तरी उसाचे बील मिळण्याबाबत वाटणारी शंका, याबाबी लक्षात घेता हा कारखाना तूर्त शासनानेच ताब्यात घेऊन तो तज्ञ प्रशासक मंडळाकडून चालवावा, अशी मागणी केली आहे. यामुळे किसनवीर कारखाना चर्चेत आला असून यातून कारखाना सावरणार का ? आणि शेतकरी हितासाठी नेमके काय होणार याचे उत्तर येणाऱया काळात शोधावे लागणार आहे हे निश्चितच.

Related Stories

शेतकऱ्यांसाठी रयत क्रांती आंदोलन छेडणार

datta jadhav

विनयभंग प्रकरणी संजय धुमाळ यांना अटक

Patil_p

गोकुळचा दूध विक्रीत विक्रम

Archana Banage

सचिन वाझेंना जामीन मंजूर, पण सुटका नाहीच

Archana Banage

सोनाराला मागितली 20 लाखांची खंडणी

Patil_p

करवीर : चाफोडी गावामध्ये एकजण कोरोना पॉझिटिव्ह तर एका संशयिताचा मृत्यू

Archana Banage