Tarun Bharat

कुंकळळीतील बेकायदेशीर डोंगर कापणीवर त्वरित कारवाई करावी

अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठावू : डॉ. जर्सन फर्नांडिस व अन्य स्थानिकांकडून इशारा

प्रतिनिधी /मडगाव

कुंकळ्ळी येथे डोंगर कापणी करून प्लॉट विकसित करण्याचे काम सुरू असल्याने त्यास काही स्थानिकांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. हा प्रकार एकदम बेकायदा असून नगरनियोजन खात्याला सेल डीड प्रक्रियेसाठी सुपूर्द करण्यात आलेल्या कागदपत्रांमधे अनेक त्रुटी आहेत. संबंधित अधिकारिणींनी या बेकायदा प्रकारावर त्वरित आवश्यक कारवाई करावी अन्यथा आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील, असा इशारा डॉ. जर्सन फर्नांडिस व अन्य स्थानिकांनी दिला आहे.

मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून सदर इशारा देण्यात आला. यावेळी ऍड. तरुण रिबेलो व अन्य उपस्थित होते. आम्ही सदर बेकायदा डोंगर कापणीसंदर्भात मागील काही दिवसांपासून आवाज उठवत आलो आहोत. स्थानिक नगरपालिका तसेच नगरनियोजन खात्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. आम्ही सदर बेकायदा डोंगर कापणीसंदर्भात सर्वेक्षण करण्याची मागणी केली असता नगरनियोजन खात्याचे अधिकारी आले. मात्र त्यांनी सर्वेक्षण करण्याऐवजी आम्हाला चुकीचे ठरविण्याचा प्रयत्न केला, असे डॉ. फर्नांडिस यांनी सांगितले.

या सर्वेक्षणावेळी आम्हाला सदर जागेचे मोजमाप करण्यास नगरनियोजन खात्याच्या अभियंत्याकडून सांगण्यात आले. तेव्हा, आम्हाला बेकायदा प्रवेश केला म्हणून अटक करविण्याचा हेतू आहे काय असा जाब विचारला असता सदर अभियंत्याने तेथून काढता पाय घेतल्याचे ऍड. रिबेलो यांनी नजरेस आणून दिले.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे

सदर जागा डेव्हलपरला विकताना करण्यात आलेल्या सेल डीडमध्ये त्रुटी असून तिसऱयाचीच जागा दुसऱयाला विकण्यात आली आहे. अन्य कित्येक त्रुटी आहेत. पालिकेला त्यांनी दिलेला परवाना मागे घेण्यास सांगितले, तर कानावर हात ठेवले जातात. नगरनियोजन खात्याकडून जाणून बुजून घोळ घालण्यात आला आहे. यामागे भ्रष्टाचार असून कित्येकांचे हात ओले करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोणी कारवाईसाठी तयार होत नाही. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात लक्ष घालून आवश्यक कृती करावी. तसेच यासंदर्भात विरोधी पक्षनेते व दक्षता विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्यास न्यायालयीन लढाई लढण्याची आम्ही तयारी ठेवली आहे, असे डॉ. फर्नांडिस व ऍड. रिबेलो यांनी स्पष्ट केले.

Related Stories

कळंगूट वॉर्ड क्रमांक 9 मध्ये शांततेत मतदान

Omkar B

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस

Patil_p

‘रूपशा नोदीर बांके’ सैनिकावर आधारित चित्रपट

Amit Kulkarni

कुंडई येथे हनुमान जन्मोत्सव

Omkar B

कुडचडेत कितीही विरोधक आले तरी काब्रालच निवडून येणार

Amit Kulkarni

म्हादई वाचविण्यासाठी एकजूटीने काम करूया

Omkar B