Tarun Bharat

कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवा; पंतप्रधान मोदींचे आवाहन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कुंभमेळा सुरू आहे. या कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून, परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्याच भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवर चर्चा केली. संक्रमित साधु-संतांच्या तब्येतीची विचारपूस करत आता कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी यांच्यासोबत आज फोनवर चर्चा केली. सर्व संतांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेतले. सर्व संत प्रशासनाला सहकार्य करत आहेत. त्यांचे मी आभार मानले. कोरोनातील संकटामुळे दोन शाही स्नान झाले आहेत. आता कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा, असे आवाहन मी केले आहे. हे या संकटाविरूद्धच्या लढय़ाला बळ देईल.’   

मोदींच्या आवाहनानंतर स्वामी अवधेशानंद यांनीही ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘आम्ही पंतप्रधानांच्या आवाहनाचा सन्मान करतो. स्वतःबरोबरच इतरांच्या जीवाचे रक्षण करणे हे पुण्याचे काम आहे. माझे सर्व संतांना आवाहन आहे की, सध्याची कारोना परिस्थिती पाहता सर्वांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. स्नान करण्यासाठी गर्दी करू नये.’

Related Stories

भाजपच्या नव्या ‘टीम’ची घोषणा

Patil_p

एअर इंडियाच्या विमानातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा प्रवास, अन्य प्रवाशी 14 दिवसांसाठी क्वारंटाईन

Tousif Mujawar

आसाममध्ये भाजपला धक्का; BPF ने सोडली साथ

datta jadhav

पूर्व लडाखमध्ये गारठतेय चिनी सैन्य

datta jadhav

बंगाल हिंसाप्रकरणी केंद्र, ममता सरकारला नोटीस

Amit Kulkarni

शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीन सीमेवरील सैन्य माघारी परतणार : राजनाथ सिंह

Tousif Mujawar
error: Content is protected !!