Tarun Bharat

“कुंभमेळ्याची चूक कमी म्हणून की काय आता चार धाम यात्रा”

ऑनलाईन टीम / डेहराडून

कुंभमेळ्याच्या आयोजनानंतर मोठ्या प्रमाणात झालेली कोरोना रुग्णांची वाढ झाली. कोरोना संसर्ग वेगाने पसरत असताना कुंभमेळ्यासारख्या गर्दी वाढवणाऱ्या सोहळ्याचं आयोजन करणे हे साफ चूक आहे. तसा आक्षेप ही घेतला जात होता. मात्र उत्तराखंड राज्य शासनाने परवानगी दिल्याने मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. हे कमी म्हणुन की काय ही आता चार धाम यात्रा, यावरुन उत्तराखंड उच्च न्यायालयाने राज्य शासनाला फटकारलं असून आपण वारंवार खजील व्हावं लागेल अशी कृती आपण करत आहात अशी विचारणा ही राज्यशासनाला केली आहे.

तुम्ही उच्च न्यायालयाला फसवू शकता मात्र जनतेला नाही. हेलिकॉप्टर घ्या, जा आणि बघा केदारनाथ-बद्रीनाथला काय सुरू आहे. इतकी गर्दी करुन आपण कुंभमेळ्याची पुनरावृत्ती करु इच्छीता काय असे परखड मत जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान सुरु असलेल्या अनागोंदी कारभारावर उत्तराखंड उच्च न्यायालयाने मत व्यक्त करत कारभारावर बोट ठवले आहे. जनतेसोबत काय सुरु आहे अशी विचारणा झाल्यावर आमची मान शरमेने खाली जाते, तेव्हा राज्य शासनाने लाखो नागरिकांच्या जिवाशी खेळ बंद कराव अशी ही टीपण्णी ही यावेळी केली, तसेच पुढील सुनावणी ९ जून रोजी होणार असल्याचे स्पष्ट केलं.

Related Stories

हरिद्वारमध्ये महाशिवरात्रीचा उत्साह

Amit Kulkarni

जम्मू काश्मीर : मनोज सिन्हा यांनी घेतली उपराज्यपाल पदाची शपथ

Tousif Mujawar

पिंपरी-चिंचवडमध्ये ईडीची कारवाई; अमर मूलचंदानी यांच्यासह कुटुंबातील 4 जण ताब्यात

datta jadhav

निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा केला; १२ मुद्द्यांच्या पत्रातून निवडणूक आयोगावर ठाकरे गटाचा आरोप

Archana Banage

अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन

Amit Kulkarni

पुणे, कोल्हापूरकरांसाठी म्हाडाची खूशखबर, पहा काय आहे आनंदवार्ता…

datta jadhav