Tarun Bharat

कुंभारजुवेत 300 कार्यकर्ते टीएमसीमध्ये

टीएमसी नेते समील वळवईकर यांनी केले स्वागत

प्रतिनिधी /पणजी

कुंभारजुवे मतदारसंघातील सातही पंचायतक्षेत्रातील 300 हून अधिक युवा कार्यकर्त्यांनी काल रविवारी सायंकाळी बिग फन सभागृह, ओल्ड गोवा येथे एका विशेष कार्यक्रमात तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी तृणमुलचे कुंभारजुवे मतदारसंघातील नेते समील वळवईकर यांनी त्यांना पक्षध्वज प्रदान करुन पक्षात रितसर प्रवेश दिला. यावेळी  मतदारसंघात तृणमुलचा विजय घडवून इतिहास रचण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी तृणमुल काँग्रेसचे थिवी मंतदासंघातील नेते किरण कांदोळकर व अन्य नेते हजर होते. मतदारसंघातील ओल्ड गोवा, करमळी, खोर्ली, गोलती-नावेली, सां मातियश, कुंभारजुवे, सांत इस्तेव्ह अशा सर्व भागातील युवा कार्यकर्त्यांचा त्यात  समावेश आहे.

कुंभारजुवेत नेत्याबरोबरच पक्षही बदल हवा

कुंभारजुवे मतदारसंघातील लोकांना आपल्या नेतृत्वामध्ये बदल घडवायचा असून त्याचबरोबर पक्षही बदलायचा आहे. भाजप सरकारच्या नाकर्तेपणा आणि अपयशाला कंटाळलेले कार्यकर्ते, मतदार आज तृणमुल काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. विरोधी पक्षा युवा मतदार सहसा सहभागी होत नाही, तरीही कुंभारजुवेत युवा वर्गाला बदल हवा असल्याने ते आपल्याबरोबर आले आहेत, असे वळवईकर म्हणाले.

राज्यात, कुंभारजुवेतही टीएमसीचा विजय

गोव्यात टीएमसीचे सरकार येणार असून त्यात कुंभारजुवेतून टीएमसीचा आमदार निवडून देऊन रखडलेला विकास सुरु करण्याची संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नंतर पत्रकारांशी बोलताना वळवईकर म्हणाले की कुंभारजुवे मतदारसंघात आपणास कार्यकर्ते व मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे. आपण यापुर्वीच संपूर्ण मतदारसंघाचा तीन वेळा दौरा पूर्ण केला आहे. आपण गेल्या 20 वर्षांपासून लोकांच्याबरोबर असून कोरोनाकाळात आपण देवाच्या कृपेने लोकांना मदत करु शकलो. त्याची पावती म्हणून बरेच मतदारसुद्धा आपल्या विजयासाठी कार्यरत झाले आहेत. कुंभारजुवेत भाजपचा पराभव आताच निश्चित झाला आहे, असे ते म्हणाले.

Related Stories

विकासाच्या बाबतीत आता डिचोलीला ठभिवपाची गरज नाठ

Amit Kulkarni

आपतर्फे आणखी पाच उमेदवार जाहीर

Amit Kulkarni

उगवे माऊली मंदिरात आज भागवत सप्ताह

Amit Kulkarni

राजविद्या केंद्रातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा

Omkar B

जमशेदपूरविरूद्धच्या बरोबरीने हैदराबादचे चौथे स्थान अबाधित

Amit Kulkarni

खनिज हाताळणीस न्यायालयाचा हिरवा कंदील

Patil_p