Tarun Bharat

अपघातांचे प्रमाण वाढल्याने कुंभोज बायपास रस्त्याची मागणी

कुंभोज / वार्ताहर

कुंभोज ता. हातकणंगले येथील बायपास रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कुंभोज-बाहुबली रोडवर गेल्या दोन ते तीन दिवसात मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले असून ऊस वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांमुळे सदर अपघात घडत आहेत. यामुळे सदर रस्त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे.

सदर रोडवर अंगणवाडी, जिल्हा मध्यवर्ती बँक, तसेच बाहुबली व रयत शिक्षण संस्था येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून बुधवार व रविवार हा कुंभोज ग्रामस्थांचा आठवडी बाजार याच रोडवर भरतो, त्यामुळे नागरिकांना सदर रोडवरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सदर ठिकाणी असून सदर रोडवर मोठ्या प्रमाणात लहान मुले व नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे अनेक वेळा घडलेल्या अपघातात नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

याबाबत कुंभोज ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कुंभोज यांच्या माध्यमातून शासनाकडे गेले अनेक वर्ष बायपास रस्त्याची मागणी करूनही शासन दरबारी सदर गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. कुंभोज ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली लावावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. बायपास रस्ता करण्यासाठी अनेक वेळा शासनाच्या प्रतिनिधींनी सदर रस्त्याचा केवळ सर्व्हे केला आहे. परंतु त्याची पूर्तता कोणत्याही पद्धतीने झाली नसून माजी सरपंच प्रकाश पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष प्रमोद सपकाळ यांच्या माध्यमातून अनेक वेळा शासन दरबारी बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली लावण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांचा पुरवठाही शासन दरबारी ग्रामपंचायत कुंभोज यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

Related Stories

कोल्हापूर : अवनितील १५ मुली कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

इचलकरंजीत लवकरच अवतणार दूधगंगा

Kalyani Amanagi

कोल्हापूर : राज्यात प्रथमच ४२५ किलो सिलेंडरचे लॉन्चिंग…

Archana Banage

तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रम’ कार्यशाळा यशस्वी संपन्न

Archana Banage

‘जंगल बस सफारी’ने अभयारण्यातील पर्यटनाला चालना मिळेल : पालकमंत्री

Archana Banage

शस्त्र तस्करीच्या विळख्यात तरूणाई

Archana Banage