Tarun Bharat

कुंसुंबी मुऱ्यातील आखाडे वस्तीला भिषण पाणी टंचाई

Advertisements

माणसांबरोबर जनावरांचेही पाण्यावीना होताहेत हाल


वार्ताहर / कास

कुंसुंबी मुरा ता. जावली येथील आखाडेवस्तीला भिषण पाणी टंचाई जाणवत असुन पाण्यासाठी नागरीकांना रात्रभर जागरण करून कडयातील झऱ्यावर आपली ताण भागवण्यासाठी धाव घ्यावी लागत असुनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने शासनाने पाण्याचा टँकर सुरु करण्याची मागणी नागरीकांतुन होत आहे.

उन्हाच्या चटक्यांचा पारा दिवसेंदिवस वाढु लागल्याने डोंगरावरील नैसर्गीक पाणवटे आटु लागले आहेत. त्यामुळे दऱ्याखोऱ्यातिल नागरिकांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असुन कुंसुंबी मुरा येथील आखाडेवस्तीला भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरीकांना कडयातील झऱ्यावर पाण्यासाठी धाव घ्यावी लागत असुन या पाणवटयातील पाणीही आटल्याने रात्रभर जागरण करून लाईनमध्ये एक एक हंडाभर पाण्यासाठी तिसष्ठावे लागत आहे त्यामुळे पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला असुन कोरोनामुळे शहरांतील चाकरमाणी वस्तीमध्ये मोठयाप्रमाणात दाखल झाल्याने आणी पाण्याची टंचाई भासु लागल्याने झऱ्यावर रात्रीची जागरण करूनही पाणी मिळत नसल्याने नागरीकांमध्ये भांडणांचा प्रत्ययही येत आहे.

नैसर्गीक झरा हा कडयात असुन पाणी आटल्याने रात्रभर पाण्यासाठी झऱ्यावर धाव घ्यावी लागत आहे. कडयातील वाट निमुळति आवघड असुन रात्रीच्या प्रवासासाठी धोकादायकही ठरू शकते ग्रामस्थ पाणीटंचाईपुढे हतबल झाले असुन त्यांनी ग्रामपंचायतीद्घारे शासनाकडे पाण्याचा टँकर सुरु करण्याची मागाणी केली असुन अदयाप संबधीत विभागाने यामागणीकडे दुर्लक्ष केले असुन तात्काळ पाण्याचा टँकर सुरु करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

सोलापूर : उजनी धरणात आवक वाढली, ३२ टक्के पाणीसाठा

Archana Banage

कोरोना चाचणीसाठी साताऱ्यात सुविधा उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Archana Banage

डॉ. राजेंद्र सरकाळे पुरस्काराने सन्मानित !

Patil_p

ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.धैर्यशील पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

Archana Banage

अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी असा दिखावा : नवाब मलिक

Tousif Mujawar

सातारा : धामणेर येथे बेकायदेशीर वाळु वाहतुक करणाऱ्यावर केली कारवाई

Archana Banage
error: Content is protected !!