Tarun Bharat

कुठ्ठाळी मतदारसंघातील समस्यां सोडवण्यासाठी मंत्री माविन गुदिन्हो यांची शासकीय अधिकाऱयांसमवेत उपासनगरात बैठक

प्रतिनिधी /वास्को

दाबोळीचे आमदार व राज्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी कुठ्ठाळी मतदारसंघातील समस्यांकडेही लक्ष घालणे सुरू केले आहे. मंगळवारी विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी आपल्या उपासनगर येथील कार्यालयात बैठकही घेतली. रस्ते, पाणी टंचाई, एमईएस कॉलेज नाक्यावरील वाहतुक कोंडी, बेकायदेशीर पार्किंग इत्यादी समस्यांवर या बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.

कुठ्ठाळी मतदारसंघाला सद्य्या आमदार नाही. ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न सध्या शेजारचे आमदार व पंचायतमंत्री माविन गुदिन्हे यांनी चालवले आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून मंगळवारी उपासनगरात बैठक झाली. यावेळी मंत्री गुदिन्हो यांनी सांकवाळ परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेली पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. निवडणुकीनंतर इतर कामेही लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्थानिकांनी आपल्यावर विश्वास दाखवून सहकार्य केल्याबद्धल त्यांनी यावेळी नागरिकांचे आभार मानले.

या बैठकीला वाहतुक पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर, वेर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रशल देसाई, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वंभर भेंडे, वीज खात्याचे सहाय्यक अभियंते जोआव लुकास, कनिष्ठ अभियंते बापू कदम, राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंते विन्सेंट डिसोजा, पीडीएचे सदस्य सचिव अशोक कुमार, श्री. पार्सेकर, सहाय्यक अभियंते श्री. नाईक, कनिष्ठ अभियंते श्री. अनिल तसेच सांकवाळ जिल्हा पंचायत सदस्या ऍड. अनिता थोरात, सांकवाळचे सरपंच गिरीष पिल्ले, उपसरपंच सुकोरिना वालीस, पंच आरिश कादर, गोविंद लमाणी, सुनील गावस व सामाजिक कार्यकर्ते गणेश लमाणी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Related Stories

दिल्लीत देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ

Amit Kulkarni

अंमलीपदार्थांचे उच्चाटन ही मुख्यमंत्र्यांची केवळ घोषणाबाजी

Patil_p

बाणस्तारी भागात चोवीस तास सुरळीत वीज पुरवठा-मंत्री गोविंद गावडे

Amit Kulkarni

इन्सुलीत तब्बल 2 कोटींचे ‘घबाड’

Amit Kulkarni

सिद्धीचा बुडून मृत्यू नव्हे तर तिचा घातपातच !

Patil_p

किनारी भागात व्यवसायासाठी करणार अनुकूल वातावरण

Amit Kulkarni