Tarun Bharat

कुडचडेतील आपले कार्यालय यापुढेही खुले राहणार

काँग्रेस उमेदवार अमित पाटकर यांनी दिलेली माहिती : जनतेच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार

प्रतिनिधी /कुडचडे

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होऊन आठ दिवस पूर्ण झालेले आहेत. आता निवडणुकांशी संबंधित घडामोडींना बऱयाच प्रमाणात पूर्णविराम लागलेला आहे व उमेदवारांना व मतदारांना निकाल जाहीर होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कुडचडे मतदारसंघात आनंदाची गोष्ट म्हणजे 80 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्याबद्दल कुडचडेचे एक स्थानिक नागरिक व काँग्रेस पक्षाचे उमेदवार या नात्याने आपण सर्वांचे आभारी आहोत, असे अमित पाटकर यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

कुडचडेत गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा चालली होती की, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी बरेच इच्छुक कार्यालये खुली करतात व निवडणूक निकाल झाला की, कार्यालये बंद करतात. त्यामुळे त्यांचे समर्थक व अन्य स्थानिक लोकांना बऱयाच अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपण मुद्दाम सांगू इच्छितो की, निवडणूक निकाल हा मतदारांच्या इच्छेप्रमाणे होणार, पण आपण जे कार्यालय सुरू केले आहे ते यापुढे रोज सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत कुडचडेच्या जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी खुले राहणार आहे. तसेच कोणालाही आपल्याला खासगीत भेटायचे असेल, तर ते मंगळवारी व शनिवारी भेटू शकतात, असे पाटकर यांनी सांगितले.

आपण रोज कुडचडेतच असणार. पण कुडचडेत ज्या अडचणी जनतेला भेडसावत आहेत त्या सोडविण्यात आपण व्यस्त राहू शकतो. म्हणून दोन दिवस लोकांना भेटण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. कारण निवडणूकपूर्व काळात आपण घरोघरी भेट दिली असता लोकांच्या बऱयाच अडचणी जाणून घेतलेल्या आहेत व त्या सोडविण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर निवडणूक निकाल जाहीर होऊन काँग्रेस सरकार स्थापित झाल्यावर लगेच आपण कुडचडेसाठी आखलेली स्पोर्ट्स अरिनाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात लक्ष घालणार आहे, अशी माहिती पाटकर यांनी दिली.

काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युतीचे सरकार येणार

सध्या राज्यात ज्या चर्चेला ऊत आलेला आहे ती पाहता व आपल्या मते यंदा गोव्यात काँग्रेस व गोवा फॉरवर्ड युतीचे सरकार स्थापित होणार. यात युतीचे अंदाजे 22 ते 23 उमेदवार नक्कीच निवडून येणार, असा दावा पाटकर यांनी केला. सध्या टपाली मतदान बहुतांश झालेले असेल. तरीही आपण सरकारी कर्मचाऱयांना आवाहन करतो की, मतदान हा त्यांचा हक्क आहे आणि तो हक्क कोणत्याच दबावाखाली त्यांनी बजावू नये. पूर्ण स्वातंत्र्य घेऊन त्यांनी मतदान करावे, असे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.

Related Stories

दोन्ही डोस घेतलेल्यांना मिळणार ‘गोवा एंट्री’!

Amit Kulkarni

सांकवाळ भागाला वादळी वाऱयाचा फटका

Omkar B

नाटय़कला जीवनाला आनंद देतात : रमेश वंसकर

Patil_p

गोवा डेअरीच्या 12 जागांसाठी तब्बल 38 उमेदवार रिंगणात

Amit Kulkarni

फोंडा पालीकेतर्फे प्रायोगिक तत्वावर एअरपोर्ट रोडवर भाजी विक्रीला प्राधान्य

Omkar B

गोमंतक मराठा समाजाने सर्जनशीलता जोपासली

Amit Kulkarni