Tarun Bharat

कुडचडेत आणखी 8 दिवस लॉकडाऊन करण्याची मागणी

कुडचडे-काकोडा पालिकेला नगरसेवकांचे निवेदन

प्रतिनिधी / कुडचडे

कुडचडे मतदारसंघात ज्या प्रकारे कोविडचे संक्रमण वाढत चाललेले आहे ते चित्र बरोबर नसून ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही तरी उपाय व्हावा या हेतूने आम्ही काही नगरसेवक मिळून नगराध्यक्षांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. काही कारणास्तव नगराध्यक्ष उपस्थित नसल्यामुळे सदर निवेदन पालिका मुख्याधिकाऱयांकडे देण्यात आले आहे. गेले सहा दिवस कुडचडेत लॉकडाऊन होता. तो आज पूर्णत्वास येत आहे. तरी लोकांच्या मागणीप्रमाणे याच प्रकारे पुढील आठ दिवस लॉकडाऊन करावा अशी विनंती त्यात करण्यात आली आहे, अशी माहिती नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांनी पत्रकारांना दिली.

यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक सुशांत नाईक, प्रदीप नाईक, अपर्णा प्रभुदेसाई, मंगलदास घाडी, समाजसेवक गाब्रियल फर्नांडिस उपस्थित होते. आज कुडचडेची कोविडसंबंधी स्थिती बिघडत आहे. त्यात नगराध्यक्ष आजारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच पालिका अभियंता, साहाय्यक अभियंता रजेवर आहेत. त्याचबरोबर नगराध्यक्ष निवड झाल्यावर कोणतीच बैठक घेण्यात आलेली नसून उपनगराध्यक्षाही पालिकेत दिसून आलेल्या नाहीत. त्यामुळे लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी कुडचडे पालिकाही पुढील आठ दिवस बंद ठेवावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे या महामारीच्या दुसऱया लाटेत लोकांना आवश्यक कामांसाठी पालिकेत येण्याची गरज भासणार नाही, असे होडारकर म्हणाले. प्रत्येक जण सुरक्षित राहणार या दृष्टिकोनातून विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Related Stories

कोरोना बळींचा आकडा 500 पार

Patil_p

नोव्हेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त

Amit Kulkarni

इब्रामपूर येथे आज विष्णू गवस यांचे किर्तन

Amit Kulkarni

कर्नाटक सरकार विरोधात गोव्याची अवमान याचिका

Patil_p

नवीन शैक्षणिक धोरण चालीस लावण्यासाठी शिक्षण संस्थानी पुढे यावे

Amit Kulkarni

गोपाष्टमी उत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

Amit Kulkarni