Tarun Bharat

कुडचडे पालिकेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

नवीन पालिका इमारतीचे उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी करण्याचा ठराव

प्रतिनिधी / कुडचडे

कुडचडे-काकोडा पालिकेची गुरुवारी मासिक बैठक झाली. यात नवीन पालिका इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासंबंधी चर्चा करण्यात आली तसेच मान्सूनपूर्व कामे, पालिकेची जुनी बाजार संकुल इमारत मोडणे व तेथे नवीन इमारत उभारणे तसेच त्यासाठी 10 दुकानदारांचे स्थलांतर करण्यासंबंधी करार करणे यासह विविध विषय नगरसेवकांकडून मांडण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष विश्वास सावंत, उपनगराध्यक्षा रूचा वस्त, नगरसेविका जस्मिन ब्रागांझा, प्रदीप नाईक, मोराईस, योलोंदा पेरेरा, रिमा एलिस, मंगलदास घाडी, प्रमोद नाईक, टोनी कुतिन्हो, दामोदर भेंडे, सुशांत नाईक, बाळकृष्ण होडारकर, अपर्णा प्रभुदेसाई, क्लेमेंटिना फर्नांडिस, मुख्याधिकारी नीलेश धायगोडकर, पालिका अभियंता दीपक देसाई आदी उपस्थित होते. सदर बैठकीनंतर नगराध्यक्ष सावंत यांनी माहिती देताना सांगितले की, कुडचडे-काकोडा नगरपालिकेच्या नवीन इमारतीचे काम पूर्णत्वास आलेले आहे. त्यामुळे सदर इमारतीचे उद्घाटन येत्या 15 ऑगस्ट रोजी करण्याचा ठराव घेण्यात आला आहे.

सदर नवीन इमारतीत तळमजल्यावर दहा दुकाने आहेत. पहिल्या मजल्यावर पालिकेचे कार्यालय राहणार असून त्यात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचे कक्ष, तर दुसऱया मजल्यावर दोन सभागृहे राहणार आहेत. सदर इमारतीच्या देखभालीसाठी निविदा काढण्यात येणार असून इमारतीची साफसफाई, दुरुस्तीचे काम सदर कंत्राटदार बघणार आहे. त्यामुळे पालिकेचा खर्च वाचणार व पालिकेला महसूलही येणार, असे त्यांनी स्पष्ट केले. कुडचडेतील पंधराही प्रभागांत मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत व लवकरच ती पूर्ण होणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

बऱयाच काळापासून पालिकेच्या जुन्या बाजार संकुल इमारतीचा (90/10) विषय रेंगाळला आहे. त्यावर लवकरात लवकर काम सुरू करण्यात येणार आहे. तसेच सदर इमारत मोडण्यात अडचण येत असलेल्या दहा दुकानदारांकडे करार करून त्यांचे स्थलांतर करण्यावर भर देण्यात येणार आहे. तेथे नवीन इमारत उभारण्यासंदर्भात काम सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जी-सुडा मार्केटमध्ये जी दुकाने आहेत त्यांच्या करारांचे पुन्हा नूतनीकरण करण्याचे काम पुढच्या आठवडय़ापासून सुरू करण्यात येणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.

Related Stories

गोवा शिपयार्डसमोरील साकवावर कार उलटली

Amit Kulkarni

मांदे येथे आयोजित केलेल्या बैलाच्या झुंझी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Amit Kulkarni

नाटय़कलाकार राजदीप नाईक यांच्या कारगाडीच्या काचा फोडल्या

Amit Kulkarni

‘आप’ला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ

Amit Kulkarni

राज्यातील पारा उतरला

Amit Kulkarni

मुळगावचे वारकरी पथक आज पंढरपुरात पोहोचणार

Amit Kulkarni