Tarun Bharat

कुडचीत पोलीस बंदोबस्त कायम

Advertisements

सलग दुसऱया दिवशीही आशा कार्यकर्त्यांकडून पोलीस बंदोबस्तात सेवा : रस्ते पडले : ओस अत्यावश्यक सेवांना मुभा

वार्ताहर/  कुडची

कुडची येथे चौघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने जिल्हा व तालुका प्रशासनाने खबरदारी घेत कुडची बंदोबस्त कायम आहे. येथील अत्यावश्यक सेवा नियमावलीत सुरू आहेत. तसेच सलग दुसऱया दिवशी पोलीस संरक्षणात आशा कार्यकर्त्यांनी घरोघरी तपासणी सुरू ठेवली आहे. दरम्यान लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपण सुरू आहे.

कुडचीत रुग्ण आढळूनही काही नागरिक विनाकारण फिरत आहेत. तर काहीजण दुचाकीवरुन फेरफटका मारत आहेत. पोलिसांकडून आवाहन करुनही दखल घेतली जात नसल्याने पोलिसांनी आपला खाक्या दाखवताना काठीचा प्रसाद दुचाकीस्वारांना देत आहेत. तसेच दुचाकीची हवा सोडण्याबरोबरच केबल तोडत कारवाई केली जात आहे. याबरोबरच कुडची शहराला जोडणाऱया परिसरातील 9 मार्गावर नाकाबंदी कायम ठेवताना पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याबरोबरच खबरदारी घेताना नागरिकांना सहकार्य करण्याचेही आवाहन केले आहे.

तसेच येथील बाजार आठवडय़ाच्या तिसऱया दिवशीही बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे लाखो रुपयांचा फटका बसला आहे. असे असले तरी लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना नियमावलीचे पालन हे स्वतःच्या जीवासाठी महत्त्वाचे आहे. याची दखल प्रत्येकाने घेताना प्रशासनास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. तर तीन दिवसांपूर्वी तपासणीसाठी गेलेल्या आशा कार्यकर्त्यांवर काहींनी हल्ला केला होता. यानंतर बुधवारी पोलीस बंदोबस्तात आशा कार्यकर्त्यांनी घरोघरी भेटी देत तपासणी चालविली होती. सलग दुसऱया दिवशी गुरुवारीही आशा कार्यकर्त्या पोलीस बंदोबस्तात तपासणी सुरू असून याला येथील नागरिकही सहकार्य करत असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

युजीसी-नेट चे नवीन वेळापत्रक जाहीर

Abhijeet Shinde

जुने बेळगाव येथे कलमेश्वर यात्रा साध्या पद्धतीने

Amit Kulkarni

राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस खुला

Amit Kulkarni

लोकमान्य टिळक दूरदृष्टीचे नेते

Omkar B

रस्त्यांचा विकास… वाहतुकीची कोंडी

Patil_p

आंत्रविषार प्रतिबंधक लसीकरण मोहीम अंतिम टप्प्यात

Amit Kulkarni
error: Content is protected !!