वार्ताहर/ कुडची
कुडची नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या माधुरी निडगुंदी तर उपनगराध्यक्षपदी कंग्रेसचे हमीदोद्दीन रोहिले यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी नगराध्यक्षा माधुरी निडगुंदी म्हणाल्या, सर्वांना विश्वासात व सोबत घेऊन शहर विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. उपनगराध्यक्ष हमीदोद्दीन रोहिले यांनीही शहराच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एस. ए. महाजन यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. ?यावेळी नगरसेवक सादीक सजन, सादीक रोहिले, मोहसिन मारुफ, दत्ता सन्नकी, मोहन लोहार, संजीव रडरट्टी यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.