Tarun Bharat

कुडची पोलिसांकडून चोरटय़ांची टोळी जेरबंद

चौघांना अटक, 35 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

वार्ताहर /कुडची

रायबाग तालुक्मयातील सुटट्टी क्रॉसवर कुडची पोलिसांनी शुक्रवारी चार संशयित चोरटय़ांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ट्रक्टर इंजीन, ट्रॉली व रोटर असे जवळपास 35 लाख 60 हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

बसवराज महादेव सनदी, दयानंद महादेव सनदी, चिदानंद शिवपुत्र लाळे (तिघेही रा. कोळीगुड, ता. रायबाग) व सिद्राम भीमाप्पा पटाईत (रा. यल्लपारट्टी, ता. रायबाग) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गस्तीवरील पोलिसांनी सुटट्टी क्रॉसवर या चौघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता सुटट्टी, दरूर, तेरदाळ व हारुगेरी क्रॉस येथून चारचाकी चार ट्रॉली, दोनचाकी चार ट्रॉली, न्यू हॉलंड ट्रक्टरची तीन इंजीन व एक रोटर असे 35 लाख 60 हजाराचे साहित्य चोरल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी व अथणी पोलीस उपअधीक्षक एस. व्ही. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक के. एस. हट्टी, कुडचीचे उपनिरीक्षक शिवराज दरीगौड, एएसआय ए. आर. साळुंखे, महांतेश पाटील, प्रकाश खवटकोप्प, सिद्धू पाटील, जमीर डांगे, पी. एस. बबलेश्वर, अरिफ मुत्नाळ, गफूर जमादार यांनी ही कारवाई केली.

Related Stories

बनावट चॅनल्स बंदीसाठी सरकारचाच पुढाकार

Omkar B

प्रसिद्ध मंदिरांसह घरेही चोरटय़ांचे लक्ष्य

Amit Kulkarni

मराठा मंदिर देणार युवकांना लष्करी प्रशिक्षण

Amit Kulkarni

किरण करंबळकर यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार

Amit Kulkarni

रामदुर्ग तालुक्यात गुरुवारी 12 पॉझिटिव्ह

Patil_p

‘बुडा’च्या चौकशीसाठी ‘आप’चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Sandeep Gawade
error: Content is protected !!