Tarun Bharat

कुडतरीत गायीने दिला तीन वासरांना जन्म

प्रतिनिधी / मडगाव

कुडतरी येथे एका शेतकऱयांच्या घरात एका गायीने तीन पाडसांना जन्म दिल्याची घटना घडली.कोंर्जे -कुडतरी येथील ज्योकी आझावेदो यांच्या घरात ही घटना घडली. श्री. आझावेदो हे सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला दुध काढत असताना गाभीण असलेली गाय उठण्याची तयारी करीत असल्याचे त्यांना दिसले. प्रत्यक्षात पशु डॉक्टरने 8 मे रोजी तिची प्रसुती होणार असल्याचे सांगितले होते. मात्र सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला त्यांच्या गायीने पहिल्या पाडसाला जन्म दिला. त्यानंतर पाच ते सहा मिनिटांच्या अंतराने आणखी दोन पाडसांना एकूण तीन पाडसांना जन्म दिला. जन्माला आलेली तिन्ही पाडसे स्त्री लिंगी आहेत.कुडतरी गावातील एक प्रगत शेतकरी तसेच कुडतरी युनियनचे अध्यक्ष सांतान रोड्रिग्स यांनी श्री. आझावेदो यांचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

अट्टल चोरटय़ाला पणजी पोलिसांनी केली अटक

Patil_p

वाळपई भाजपचे नेते सत्यविजय नाईक याचा आप पक्षात प्रवेश

Amit Kulkarni

कोरोना संक्रमण काळात नवीन भाडेकरु ठेऊ नयेत

tarunbharat

कोळंब – रिवण भागाला वादळाचा तडाखा

Amit Kulkarni

पर्वरीत भटक्या जनावरांची वाढती समस्या

Patil_p

दौलतराव हवालदार सेवानिवृत्त

Omkar B