Tarun Bharat

कुडाळमधील राड्याप्रकरणी आमदार वैभव नाईकांसह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Advertisements

कुडाळ/प्रतिनिधी

कुडाळ येथे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावरून पोलिसांनी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. कुडाळ येथील राडा प्रकरणात बेकायदा जमाव करून तसेच कोरोना काळात लोकांच्या आरोग्यास आणि जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करून केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह वीस ते पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भाजपच्या १० ते १२ जणांवर कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर भादंवी कलम १८८,१४३ अन्वये गुन्हे दाखल केला आहे.

दरम्यान तीन दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. शिवसेना भवनासमोर आंदोलन करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना शिवसेना कार्यकर्ते भिडले. तशाच स्टाईलचा राडा शनिवारी कोकणात सिंधुदुर्गमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला. दरम्यान सिंधुदुर्गमध्ये आज एका पेट्रोलपंपावर शिवसेना आणि राणेसमर्थक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी एका पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल वाटायला सुरुवात केली. शहरात भाजपला पेट्रोल दरवाढीवरून खिजवण्यासाठी हा प्रकार केल्याचं बोललं जात होतं. भाजपच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर राणेसमर्थक भाजपा कार्यकर्ते तिथे पोहोचले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यावेळी आमदार वैभव नाईक देखील यावेळी उपस्थिती होते . पण तेवढ्यात पोलिसांनी मध्ये पडत हा प्रकार थांबवला.

Related Stories

‘जवाहर’ ऊस पीक स्पर्धेत चिंचवाड येथील शेतकऱ्यांचे वर्चस्व

Abhijeet Shinde

सलील पारेख यांची इन्फोसिसच्या प्रमुखपदी नियुक्ती

Abhijeet Khandekar

Sangli; आमचे बंड शिवसेना विरोधात नसून राष्ट्रवादी विरोधात : जिल्हा प्रमुख आनंदराव पवार

Abhijeet Khandekar

शिंदे गट आदित्य ठाकरेंवर मेहेरबान!

datta jadhav

सातारा : सामूहिक प्रार्थना केल्याने नागठाणेत १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

पोत्यात भरून कोंबडय़ा नदीत फेकल्या

NIKHIL_N
error: Content is protected !!