Tarun Bharat

कुडाळ आगारात आली ‘विठाई’

नवीन एसटी बसचा शुभारंभ

प्रतिनिधी / कुडाळ:

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ एस. टी. आगाराच्या ताफ्यात ‘विठाई’ ही नवीन एस. टी. बस दाखल झाली आहे. या बसचा शुभारंभ वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ पं. स. उपसभापती जयभारत पालव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. कुडाळ आगाराला आणखी दोन बसेस लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे नाईक यांनी सांगितले.

यावेळी जि. प. सदस्य अमरसेन सावंत, माजी उपसभापती श्रेया परब, आगारप्रमुख सुजित डोंगरे, पं. स. माजी सदस्य अतुल बंगे, विभागप्रमुख बबन बोभाटे व गंगाराम सडवेलकर, नगरसेवक सचिन काळप व मेघा सुकी, नेरुर सरपंच शेखर गावडे, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, एस. टी. विभागीय कार्यालयाचे अधिकारी श्री. गोसावी, सुरक्षा व दक्षता अधिकारी भानुदास मदने, युवासेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख रमाकांत ताम्हाणेकर, दीपक आंगणे, बाळा पावसकर, प्रताप साईल, उदय मांजरेकर, राजू गवंडे, नीलेश सामंत, सुप्रिया मांजरेकर, अनुप सावंत, सुबोध सामंत, प्रशांत तेंडोलकर, नितीन सावंत, मंजुनाथ फडके, बाळू पालव आदींसह एस. टी. कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

वेंगुर्ले न.प.च्या तत्कालीन जनमाहिती अधिकाऱ्यावर शास्तीची कारवाई

NIKHIL_N

लॉकडाऊन काळात कॅरम फॉर्मात

NIKHIL_N

‘बांधकाम’ च्या बँक खाते जप्तीचे आदेश

NIKHIL_N

जिल्हा नियोजन समितीची सभा 21 रोजी

NIKHIL_N

आमदार नाईक यांच्या संपर्कात 200 हून अधिक व्यक्ती

NIKHIL_N

कट्टर राणे समर्थक राजेश शेडगे यांचा शिवसेनेत प्रवेश

Anuja Kudatarkar