Tarun Bharat

कुडाळ येथे कोविड रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर सुरू

Advertisements

वार्ताहर / कुडाळ:

जिल्हय़ात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, कुडाळ तालुक्यासाठी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर (हायवेनजीक) कोविड 19 रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर शनिवारपासून सुरू करण्यात आले. त्याचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. या सेंटरमध्ये मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तालुक्यातील लोकांना सोयीस्कर व्हावे, म्हणून हे सेंटर सुरू करण्यात आले आहे.

सध्या जिल्हय़ात कोरोनाचा प्रसार होण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्हय़ात येणारे चाकरमानी तसेच परजिल्हा व राज्यातून आलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची तातडीने ‘कोविड-19’ टेस्ट करून मिळावी. त्यांना जिल्हा रुग्णालयात जावे लागू नये, यासाठी आमदार नाईक यांच्या प्रयत्नातून कुडाळ येथे हे सेंटर सुरू करण्यात आले आहे.

कुडाळ पं. स. उपसभापती जयभारत पालव, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, अतुल बंगे, संजय भोगटे, विकास कुडाळकर, संतोष शिरसाट, श्रेया परब, वर्षा कुडाळकर, नगरसेवक सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर, प्रज्ञा राणे,  जीवन बांदेकर, गंगाराम सडवेलकर, बबन बोभाटे, युवासेनेचे मंदार शिरसाट, सुशिल चिंदरकर, राजू जांभेकर, संदीप म्हाडेश्वर, नागेश आईर, राजू गवंडे, नितीन सावंत, बाबी गुरव, सुयोग ढवण, कृष्णा तेली, नागेश जळवी आदी यावेळी उपस्थित होते.

या तालुक्यात जिल्हय़ाबाहेरून आलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास किंवा कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची येथे कोविड टेस्ट मोफत केली जाणार आहे. अहवाल अर्ध्या तासाच्या आत मिळणार आहे, असे नाईक यांनी सांगितले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश नलावडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव घुर्ये, डॉ. सचिन महिंद्रे, डॉ. अमोल दूधगावकर, विनम्र तारी, विनोद जाधव, दीपा नाडकर्णी, अर्चना देसाई, सिद्धार्थ बावकर, समीर मेहत्तर, शैलेश तोंडवळकर उपस्थित होते.

नाईक यांनी या सेंटरमध्ये ‘कोविड-19’ची चाचणी कशा पद्धतीने केली जाणार आहे, याबाबत डॉ. नलावडे व डॉ. घुर्ये यांच्याकडून माहिती घेतली.

62 वर्षांवरील व्यक्तीला मधुमेह, दमा आजार असेल, तर त्यांची तात्काळ टेस्ट करून त्या रुग्णाला तसेच कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह येऊनही ज्या व्यक्तीला दमा, मधुमेह असेल त्यांनाही जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. नलावडे यांनी सांगितले. टेस्टिंगसाठी आलेल्या व्यक्तींचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागते. सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ही टेस्ट घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

दापोलीत आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

रत्नागिरी : ‘कळंबणी’तील अधिपरिचारिका अन्यत्र वर्गचा आदेश अखेर रद्द

Archana Banage

परंपरेला फाटा देत लाल, काळ्य़ा भाताची लागवड

Patil_p

..अन् जुन्या आवडींना सवड मिळाली!

Patil_p

मृतदेहासोबत तब्बल पाच दिवस

NIKHIL_N

विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला जीवदान

Patil_p
error: Content is protected !!