Tarun Bharat

कुडासे येथे जमीन वादातून पाळकोयत्याने हल्ला

वार्ताहर / दोडामार्ग:

जमिनीच्या वादातून कुडासे-वानोशी येथे एका व्यक्तीला हात व पायावर पाळकोयत्याने हल्ल करीत गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुडासे-वानोशी येथील पेडणेकर व शेर्लेकर या दोन कुटुंबात गेल्या कित्येक वर्षांपासून जमिनीवरून वाकडीक आहे. शुक्रवारी सायंकाळी याच जमिनीत काम करताना दिलीप लक्ष्मण शेर्लेकर याला मनोहर राजाराम पेडणेकर यांनी हटकले. त्याचदरम्यान दोघात वादावादी झाली. त्यावेळी मनोहर पेडणेकर यांनी दिलीप शेर्लेकरवर हल्ला करीत हातावर, पाठीवर व पायावर पाळकोयत्याने मारत जखमी केले. दिलीप शेर्लेकर याने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मनोहर पेडणेकरवर गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

बेंगळूरस्थित कंपनी विकसित करणार ड्रोन वितरण मेलबॉक्स

Abhijeet Khandekar

क्षारपड जमीन सुधारण्यासाठी केंद्राचे अनुदान मंजूर : ‘दत्त”चे चेअरमन गणपतराव पाटील

Abhijeet Khandekar

सांगली : विद्यार्थ्यांना प्रवेश द्या अन्यथा आंदोलन

Archana Banage

ओमनीची दोन ऍक्टिवांना धडक ; ऍक्टिवाचालक १० फुटांवरून पडला खाली

Rohit Salunke

शाहूवाडी परिसरात शुकशुकाट ; पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण

Archana Banage

पोलिसांच्या वाहनात स्फोटाचा कट उधळला

Patil_p