Tarun Bharat

कुणकेरीतील युवक युवतींचा नवाआदर्श

गावासाठी दिली ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन

ओटवणे / प्रतिनिधी :-

सध्या कोविड १९ ची दुसरी लाट सुरु झाली असून याचा प्रसार खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. हे ओळखून कुणकेरी गावातील युवक व युवतींनी एकत्र येऊन स्वखर्चातून सुमारे 80 हजार किमतीची ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन गावासाठी उपलब्ध करून दिली. कुठल्याही सरकारी किंवा राजकीय पुढाऱ्याच्या मदतीची अपेक्षा न करता गावातील युवक युवतींनी केलेले हे कार्य जिल्ह्यासाठी आदर्शवत आहे. कुणकेरी आंबेगाव आरोग्य उपकेंद्रामध्ये ऑक्सिजन कॉंसेंनतेटर मशीनचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी सरपंच विश्राम सावंत, उपसरपंच शिल्पा कुणकेरकर, डॉ. श्रद्धा कासार, तलाठी संतोष धोंड, ग्रामसेविका लीला मोरये, ग्रामसेवक अमित राऊळ, कृषी सहाय्यिका तृप्ती राणे, सुहास आंबेस्कर आदिसह कुणकेरी आंबेगावचे आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

मनरेगामधून ग्रामीण भागामध्ये पाणंद व खडीकरण रस्ते निर्मितीचा संकल्प

Patil_p

अन्नपूर्णा गावकर यांचे निधन

NIKHIL_N

लोऱयात विषारी द्रव प्राशनाने तरुण गंभीर

NIKHIL_N

चार वर्षांतील ‘इंदिरा आवास’ही मग अनधिकृतच

NIKHIL_N

जिह्यात कमी चाचण्यामुळे रूग्णसंख्येत घट

Patil_p

रत्नागिरी : दापोलीत कोविड सेंटरची क्षमता वाढणार

Archana Banage