Tarun Bharat

कुणाचीही गुंडागिरी, दहशत खपवून घेणार नाही – मुख्यमंत्री

Advertisements

रवी शिरोडकर खूनी हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री गंभीर : मायकल लोबोही खुनीहल्ल्याबाबत बनले आक्रमक

गिरीश मांद्रेकर /म्हापसा

नागवा हडफडे येथे रवी शिरोडकर यांच्यावर झालेल्या खूनी हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गांभीर्याने घेतले असून आपल्यास राज्यात कोणतीच गुंडागर्दी वा कुणाची दहशत नको आहे. जे कोण गुंडगिरीत गुंतलेले आहेत त्यांच्या मुसक्या आवळा असा स्पष्ट आदेश आपण पोलिसांना दिला आहे, असे ते म्हणाले.

 कळंगुटच्या काही नागरिकांनी या खूनी हल्ल्याबाबत म्हापसा टय़ुरिस्टमध्ये भेट घेऊन याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी कळंगुटचे आमदार मायकल लोबो, म्हापशाचे आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा उपस्थित होते.

 भाजपा सरकारात काही गुंड दहशत माजवत आहे ही गोष्ट आपण कदापी सहन करणार नसून या सर्वांना आतमध्ये टाकण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान कळंगुटचे आमदार मायकल लोबोही याबाबत बरेच संतप्त झाले असून त्यांनी पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी, पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्याशी सकाळी म्हापशात चर्चा करून आपण आपल्या मतदारसंघात अशी दहशत खपवून घेणार नाही. कुणाचीही याबाबत हयगय करू नका असा आदेश दिला.

 रवीच्या पोटात 14 सुऱयाचे वार

हडफडे नागवा सर्कलजवळ पहाटेच्यावेळी 17 जणांच्या गटाने कळंगूट येथील नागरिक रवी शिरोडकर यांच्यावर हल्ला केला. टारझन पार्सेकर व इतर साथीदारांनी रवीच्या पोटात वार करून पळ काढला होता. रवीच्या आतडय़ांना पूर्णतः छिद्रे पडून आतमधून रक्त वाहत आहे. रवीच्या पोटावर 14 चाकूचे वार आहेत. रवीची प्रकृती खूप गंभीर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

दहा संशयित आरोपींना अटक

रवी शिरोडकर या तरुणावर झालेल्या चाकूहल्ला प्रकरणी हणजूण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. सोमवारी पहाटे आंबोली (महाराष्ट्र) येथे लपून राहिलेल्या अन्य पाच संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आतापर्यंत हणजूण पोलिसांनी एकूण 10 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये टारझन पार्सेकर (हडफडे, साळगाव), शैलेश नाईक (कामुर्ली), सिद्धांत सुर्यकांत मांद्रेकर (गोलीतीवाडा साळगाव), अमन रोहिदास शिरोडकर (निगवाडा साळगाव), प्रशांत राजू (नागवा), राजेश केरकर (मरड साळगाव), सागर पाटील, साहील पेडणेकर, सागर वावलापी (कांदोळी), श्रेणीत साखळकर (साळगाव) यांचा समावेश आहे. पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी, निरीक्षक प्रशल देसाई, उपनिरीक्षक साहील वरक यांनी ही माहिती हणजूण येथे पोलीस स्थानकात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

छोटय़ा गँगनी डोके वर काढले

एरवी थंड स्वभावाचे सर्वांशी समजूत बोलणारे आमदार मायकल लोबो यांना पत्रकारांनी म्हापसा येथे रवी शिरोडकर खूनीहल्ला प्रकरणी छेडले असता ते बरेच संतप्त झाल्याचे पहायला मिळाले. पत्रकारांशी बोलताना लोबो म्हणाले, याबाबत आताच मुख्यमंत्र्याशी बोलणी झाली आहे. टय़ुरिस्टमध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा युवा पिढीचे त्यांना निवेदनही शिष्टमंडळाने दिले आहे. छोटी छोटी गँग होती त्यांनी आपले डोके वर काढून ती आज मोठी झाली आहेत, याला जबाबदार कोण? गोवा पोलिसांनी याची जबाबदारी स्वीकारावी. आपण व मुख्यमंत्रीही याबाबत पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षकांशी बोललो आहोत अशी माहिती लोबो यांनी दिली.

दळवीनी सिंघम प्रमाणे काम करावे

म्हापशाचे उपविभागीय पोलीस अधीक्षक जिवबा दळवी यांच्या हद्दीत हे प्रकरण झाले आहे. दळवींना सिंगम म्हटले म्हणून चालत नाही तर सिंघमप्रमाणे त्यांनी काम करून दाखविणे काळाची गरज आहे हे त्यांना आपण सांगितले आहे. गावात दहशत माजवणाऱयांच्या मुसक्या पोलिसांनी आवळायला हव्यात. हप्ते वसूली करणे, दुकानदारांना धमकी देऊन पैसे उकळणे, हॉटेल बांधतात त्यांच्याकडून खंडणी घेणे हे आता कायमचे बंद होणे गरजेचे आहे. अशा हल्ल्याने राज्याचे नाव आज बदनाम होत चालले आहे. दादागिरी व गुंडागिरी करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आमदार लोबो यांनी स्पष्ट केले.

दहशत माजिवणाऱयांना तडीपार करा

यापुढे असे राज्यात दहशत माजिवतात त्यांना तडीपार करा शिवाय त्यांना जामीन मिळणार नाही याची व्यवस्था करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिला आहे.

आमदार लोबोनाही धमकावण्याचा प्रयत्न

रवी शिरोडकर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्या दिवशी दुपारी रवीचे मित्र, कुटुंब व अन्य 100 जण गावातील नागरिक आपणास भेटायला घरी आले असता या गँमधील काहीजण बुलेट घेऊन आपल्या निवासस्थानाजवळ आले व गेट बाहेरून आमच्या घरी कोण कोण आले त्याची पाहणी करू लागले. आमदाराच्या घरी येऊन असे दहशत माजवू लागले तर सामान्य जनतेचे काय? या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी. यामागे कोण आहेत याची विचारपूस करावी व सर्वांना कोठडीत टाकावे असा आदेश आमदार लोबोनी पोलीस अधिकाऱयांना दिला आहे.

आपण अवघ्या तीन महिन्यापूर्वीच बार्देशात उपविभागीय अधिकारी म्हणून ताबा घेतला आहे. आपल्या हद्दीत यापुढे असे प्रकार घडणार नाही हे यापुढे आपण लक्षात घेईन असे उपअधीक्षकांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी म्हापसा पोलीस निरीक्षक परेश नाईकही उपस्थित होते.

आमदार मायकल लोबो यांनी दुपारी हणजूण पोलीस स्थानकात धाव घेऊन तेथे उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्यासोबत निरीक्षक प्रशल देसाई यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. रवी शिरोडकर यांचे कुटुंब तसेच मित्र व कळंगुटचे ग्रामस्थ उपस्थित होते. नागरिकांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली. उपअधीक्षक म्हणाले, तपास कार्य योग्य दिशेने चालले असून सर्व संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात येईल. यापुढे आपल्या हद्दीत गुंडागिरीला थारा देणार नाही. अशी माहिती यावेळी पोलीस अधीक्षक जिवबा दळवी व निरीक्षक प्रशल देसाई यांनी दिली.

Related Stories

लेफ्टनंट जनरलपदी सिंधुदुर्गचे सुपुत्र

Amit Kulkarni

गोव्याने मिळविलेले यश जगासाठी प्रेरणादायी

Patil_p

किरण ठाकुरांना खरी लोकमान्यता

Amit Kulkarni

रावण सत्तरी भाजी उत्पादनात अग्रेसर

Patil_p

खाजने-अमेरे-पोरस्कडे पंचायतीतर्फे गोवा मुक्तीदिन साजरा

Amit Kulkarni

मडगावातील ऐतिहासिक लोहिया मैदानाची परवड चालूच…

Patil_p
error: Content is protected !!