Tarun Bharat

कुद्रेमनी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

काकती पोलीस स्थानकात एफआयआर

प्रतिनिधी /बेळगाव

रवळनाथनगर, कुद्रेमनी येथील एका तरुणाने परसातील काजूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला असून क्षुल्लक कारणावरुन झालेल्या मनस्तापातून त्याने आपले जीवन संपविले आहे.

चेतन शट्टूप्पा पन्नाळकर (वय 18, रा. कुदेमनी) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी दुपारी 4 ते 6 यावेळेत ही घटना घडली आहे. त्याचे वडील व कुटुंबिय घरापासून जवळच असलेल्या एका परिचितांच्या घरी पूजेला गेले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे.

चेतनचे वडील शट्टूप्पा पन्नाळकर यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. चेतन ट्रक्टर घेण्याची मागणी करत होता. थोडय़ा दिवसांनी ट्रक्टर घेवू, असे त्याला वडिलांनी सांगितले होते. क्षुल्लक कारणावरुन या तरुणाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

वारकरी भजनी मंडळ संत रोहिदास पुण्यतिथी साजरी

Patil_p

कोरोनाचे नियम पाळत होणार मतमोजणी

Amit Kulkarni

गणेशोत्सवासाठी सुरू झाल्या जादा बस

Amit Kulkarni

मागीलवर्षी आकारलेली सेसची रक्कम अखेर परत

Omkar B

शहर परिसर अडकला बॅरिकेड्सच्या विळख्यात

Patil_p

शहरात उन्हाच्या चटक्यांसह पाणीटंचाईची झळ

Amit Kulkarni