Tarun Bharat

कुपवाडचा गुन्हेगार सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

कुपवाड / प्रतिनिधी

कुपवाड पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून शुक्रवारी हद्दपार करण्यात आले आहे, अशी माहिती सपोनि अविनाश पाटील यांनी दिली. यामध्ये सिकंदर अल्लाउद्दीन मुलाणी २३ रा.कापसे प्लॉट, कुपवाड असे त्याचे नाव असून त्याला सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यामधून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांनी कुपवाड पोलिसांना दिले आहेत.

त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. रेकॉडवरील गुन्हेगार मुलाणी विरोधात कुपवाड पोलिसात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने मुलाणी या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा हद्दपारीचा प्रस्ताव कुपवाड पोलिसांनी मिरजेचे प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार या गुन्हेगारास दोन जिल्ह्यामधून हद्दपार केले आहे. त्याला कुपवाड पोलिसांनी शुक्रवारी कर्नाटकातील तिकोटा जि.विजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोडण्यात आले.

Related Stories

जीवे मारण्याची धमकी देत ऐवज लांबवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

Archana Banage

गोकुळ प्रकल्प येथे पेट्रोल पंपास मंजुरी

Archana Banage

क्षेत्र नृसिंहवाडी : दत्तभक्तांना प्रतीक्षा दक्षिणद्वार सोहळ्याची

Archana Banage

कॅट शो पहाण्यासाठी बालचमुंची मोठी गर्दी

Abhijeet Khandekar

शाहूवाडी तालुक्यात गवतास आग लागून सुमारे चार लाखाचे नुकसान

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ात ६४ रुग्णांची वाढ

Archana Banage