Tarun Bharat

कुपवाडमध्ये चोरी; २० हजारांचे इलेक्ट्रिक साहित्य लंपास

Advertisements

कुपवाड / प्रतिनिधी

 कुपवाडमधील जुना बुधगाव रोडलगत राहणाऱ्या फरद्दीन दस्तगीर मकानदार यांच्या सहारा फॅब्रिकेशन कारखान्यात गुरुवारी रात्री चोरी झाल्याचे उघड झाले असून याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली आहे. चोरट्यांनी कारखान्यातील २० हजार रुपये किंमतीच्या इलेक्ट्रिक साहित्यांची चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी चोरीप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फरद्दीन मकानदार यांच्या मालकीचा जुना बुधगाव रोडलगत सहारा फॅब्रिकेशन कारखाना आहे. गुरुवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या कारखान्याच्या दरवाजाचा कडी, कोयंडा काढून आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी कारखान्यातील लोखंडी कटींग मशीन, वेल्डिंग साहित्य असा २० हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. याबाबत मकानदार यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दीली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Related Stories

कोयना धरणातील पाण्याचा रंग पुन्हा बदलला..!

Archana Banage

मंत्री जयंत पाटीलांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट

Archana Banage

शिरसी दरोड्यातील एका आरोपीस सश्रम कारावास

Archana Banage

सांगली : कोविड सेंटरमधून रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांचे पलायन

Archana Banage

कुपवाडमध्ये विवाहीत प्रेमीयुगलाची विषप्राशन करून घेतला गळफास

Abhijeet Khandekar

Sangli : तळे फुटून साडेतीन एकरातील ऊस मातीखाली

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!