Tarun Bharat

कुपवाडमध्ये तरुणाला काठी, दगडाने बेदम मारहाण : १२ जणांवर गुन्हा  

कुपवाड / प्रतिनिधी 

घरगुती कारणावरुन सतत चिडविल्याने याचा जाब विचारण्यास गेलेल्या एका तरुणास दहा ते बाराजणांनी संगनमत करून काठी, दगड व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे.

या हल्ल्यात रोहित राजाराम झेंडे (वय २३,रा.शिवनेरीनगर, कुपवाड) हा जखमी झाला असून त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी संशयित अनिल पुकळे, सुनिल पुकळे, सिध्दू पुकळे, बाळू नेमाणे, संतोष शिंदे (सर्व रा.शिवनेरीनगर, कुपवाड) व अन्य अनोळखी साथीदार मिळून बारा जणांविरोधातयांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

उद्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात 2 रुपयांची वाढ

datta jadhav

अमेरिकेत मृत्यूतांडव; 24 तासात 2108 बळी

prashant_c

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत काय म्हणाले शरद पवार?

datta jadhav

सांगली : तासगावात 13 तर तालुक्यात 71 कोरोना रूग्ण

Archana Banage

स्थायी सभापती निवडीत राष्ट्रवादीकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम; भाजपाचे धीरज सुर्यवंशी विजयी

Archana Banage

बेवारस वाहनांच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही कारवाई

Archana Banage