Tarun Bharat

कुपवाडमध्ये तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या तिघांवर गुन्हा

Advertisements

प्रतिनिधी / कुपवाड

कुपवाडमधील अवधूत कॉलनीत राहणाऱ्या तरुणांनी येथील मैदानावर वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी तिघाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये निखील मोहन कदम (२४,रा.बामणोली), आकाश प्रताप काटकर (२२) व अवधूत केरबा सदामते (२१, दोघे रा.सावळी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापैकी मुख्य संशयित निखील कदम याच्यावर कुपवाड एमआयडीसीतील एका उद्योजकाची २० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 

अवधूत सदामते, आकाश काटकर, निखिल कदम

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांपैकी निखील कदम याचा मंगळवारी वाढदिवस होता. यानिमित्ताने केक कापून वाढदिवस साजरा करण्यासाठी निखील कदम, आकाश काटकर व अवधूत सदामते तिघेजण मंगळवारी रात्री कुपवाडच्या माळरानावरील अवधूत काॅलनीतील खुल्या मैदानावर एकत्रित जमले. यावेळी वाढदिवसानिमित्त काही तरुण तलवारीने केक कापत असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. त्यानुसार सपोनि नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी निखील कदम याच्या वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापत असताना तिघेही सापडले. पोलिसांनी तीघांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले. यावेळी केक कापण्यासाठी आणलेली तलवार व मोटारसायकल (एम.एच.१० सी.पी.९१६०) मिळून ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.

Related Stories

ताकारी कमळ भैरवचा डोंगर पर्यटकांचे नवे आकर्षण

Archana Banage

पुण्यात गांजा विक्री करणाऱ्या सासू-सुनेला अटक

datta jadhav

बीड हादरलं! भाजप शहराध्यक्षाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

datta jadhav

शिवसेना सोडणार नाही,हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार, यात कोणतेही तडजोड नाही: मुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदेंचे थेट आव्हान

Rahul Gadkar

सांगलीत हळद व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना १२ लाखांचा गंडा

Archana Banage

फडणवीसांवर आक्षेपार्ह पोस्ट भोवली; तरुणावर गुन्हा

datta jadhav
error: Content is protected !!