Tarun Bharat

कुपवाडमध्ये हॉटेल तोडफोड व खूनीहल्ला

पाचजणांना अटक: १४ दिवस न्यायालयीन कोठड़ी

कुपवाड / प्रतिनिधी 

मिरज एमआयडीसीतील हॉटेल अशोका बारमधील साहित्यांची कोयत्याने तोडफोड करून हॉटेल व्यवस्थापकावर खूनीहल्ला केल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी सोमवारी पाचजणांना अटक केली.त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठड़ीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला असल्याचे कुपवाड पोलिसांनी सांगितले.

यामध्ये संशयित वैभव राजाराम आवळे (वय २५), समर्थ संजय गायकवाड (वय १९, दोघेही रा.हडको कॉलनी, मिरज), गौस ऊर्फ निहाल गब्बार मोमीन (वय २८), समर्थ ऊर्फ श्री विश्वास गवळी (वय २१, दोघेही रा.सुभाषनगर,ता.मिरज), सागर निवास धनवडे (वय २३,सध्या रा.बाराईमाम दर्ग्याजवळ, मूळ रा.दबडे चाळ, माळी गल्ली,मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर एकजण अद्याप फरार आहे.

या हलेखोरांनी मिळून हॉटेल अशोका बारमध्ये घुसुन साहित्याची कोयत्याने तोड़फोड़ करून व्यवस्थापक नागनाथ निवृत्ती शिंदे (वय ३२,सध्या रा.ज्ञानगिरी वसाहत,सावळी) यांना मारहाण करून डोक्यात बाटली फोडून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी पाच संशयितांना अटक केली आहे.

Related Stories

गोपीनाथ मुंडे यांना सांगलीत अभिवादन

Archana Banage

सांगली जिल्ह्यात अद्यापही ७ हजार ९०५ कुटुंबे स्थलांतरित : जिल्हाधिकारी

Archana Banage

दिवे घाटात, माउली थाटात.!

Abhijeet Khandekar

सांगली : मण्यार सापाच्या दंशाने भावापाठोपाठ बहिणीचाही मृत्यू

Archana Banage

सांगली : कोकरूड पोलीस ठाणेला ए प्लस प्लस, आयएसओ स्मार्ट पोलीस स्टेशन नामांकन

Archana Banage

अखेर माधवनगर ग्रामपंचायतला आली जाग

Archana Banage