Tarun Bharat

कुपवाडा : तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात सुरक्षा दलाला यश

ऑनलाईन टीम / कुपवाडा : 

उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. लष्कराच्या 28 आरआरने आज सकाळी ही कारवाई केली.

तीन दहशतवादी कुपवाड्यातील सोगम परिसरात लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानुसार आज सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी सोगम परिसरातील वनक्षेत्रात शोधमोहीम सुरू केली. त्या तिन्ही दहशतवाद्यांचे फोटो यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सुरक्षा दल सतर्क होते. शोध मोहिमेदरम्यान या तिन्ही दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात सुरक्षा दलाला यश आले. लष्कराकडून या तिघांचीही कसून चौकशी सुरू आहे. या तिघांकडून मोठे खुलासे होतील असा लष्कराच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. आज दहशतवादविरोधी दिनादिवशीच ही कारवाई केल्याने सुरक्षा दलावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Stories

संसदेपर्यंत ट्रक्टर मार्च काढणार आंदोलक

Patil_p

नामीबियाच्या जादुई गोलांच्या रहस्याची उकल

Patil_p

सरकार पाडण्याला राज्यपालांनी सहाय्य करावे का?

Patil_p

कुपवाडला “महापौर आपल्या दारी” उपक्रमात तक्रारींचा पाऊस

Abhijeet Khandekar

शरद-लालूंचे पुनर्मिलन

datta jadhav

वेल्लोरमध्ये 10 वाहने परस्परांना धडकली

Patil_p
error: Content is protected !!