Tarun Bharat

कुमसगी क्रॉसजवळ घुबड जप्त

Advertisements

दोघा जणांना अटक, पोलीस-वन विभागाची कारवाई

प्रतिनिधी/ बेळगाव

सिंदगी (जि. विजापूर) तालुक्मयातील कुमसगी क्रॉसजवळ दोघा जणांना अटक करून घुबड जप्त करण्यात आले आहे. बेळगाव येथील पोलीस-वन विभागाच्या अधिकाऱयांनी शनिवारी ही कारवाई केली असून या टोळीतील आणखी एक जण फरारी झाला आहे.

बसण्णा रामचंद्र पवार (वय 60), विठ्ठल बसण्णा पवार (वय 32) दोघेही राहणार जेरटगी, ता. जेवरगी, जिल्हा गुलबर्गा अशी अटक करण्यात आलेल्या पिता-पुत्राचे नाव आहे. या टोळीतील विठ्ठलचा भाऊ शिवू बसण्णा पवार हा फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीस-वन विभागाच्या उपनिरीक्षक रोहिणी पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघा जणांकडून दीड किलो वजनाचे एक घुबड, केए 32, ईव्ही 4812 क्रमांकाची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या दोघा जणांना सिंदगी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

Related Stories

पूरग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार

Patil_p

बेळगाव-हुक्केरीतील पाच जणांना कोरोना

Patil_p

पतंग उडविण्याचा आनंद बेततोय पक्ष्यांच्या जिवावर

Amit Kulkarni

डीके लायन्स विजयी, लॉगर स्पोर्ट्सची एक्स्ट्रीमवर निसटती मात

Amit Kulkarni

गोकाक फॉल्ससाठी विशेष बससेवा

Amit Kulkarni

विकास करा; पण नागरिकांची दिशाभूल नको!

Amit Kulkarni
error: Content is protected !!