Tarun Bharat

कुरधुंडा येथील अपघातात चौघेजण जखमी

वार्ताहर / संगमेश्वर

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीकच्या कुरधुंडा येथे बोलेरो पिकअप् आणि स्विप्ट गाडीमध्ये झालेल्या अपघातात चौघेजण जखमी झाले.

या अपघातात रोहित दीपक मुणगेकर (रा. परटवणे) व रोहित रायसिंग गायकवाड या दोघांसह आणखी दोघेजण जखमी झाले. या बाबत नीलेश माधव केतकर यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कुमार केतकर हे बोलरो पिकअप् गाडी घेवून चिपळूण ते रत्नागिरी असे निघाले होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुरधुंडा येथे आले असता रत्नागिरीच्या दिशेकडून संगमेश्वरला येणाऱया स्विप्ट गाडीने ड्रायव्हर साईडला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात पिकअप् गाडीचा क्लिनर रोहित म्ह्णागेकर हे जखमी झाले. तसेच स्विप्ट गाडीमधील दोघेजण जखमी झाले. या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली. अधिक तपास पोलीस संतोष झापडेकर करीत आहेत.

Related Stories

रंगपंचमी साधेपणाने, बच्चे कंपनीने लुटला आनंद!

Patil_p

विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत त्रिंबक हायस्कूलचे यश

Anuja Kudatarkar

सावंतवाडी खासकिलवाडा येथील तरुणाचा शॉक लागून मृत्यू

Anuja Kudatarkar

मुंबई-गोवा महामार्ग प्रश्नी सर्व आमदार, खासदार एकवटले

Patil_p

रत्नागिरी : शाळांच्या डोक्यावर `ब्रीज कोर्स’चे भूत

Archana Banage

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा!

NIKHIL_N