Tarun Bharat

कुरुंदवाडचे बाप्पा चालले जर्मनीला…. !

प्रतिनिधी / कुरुंदवाड

दिवसेंदिवस परदेशातील गणेशोत्सव अधिक लोकप्रिय होऊ लागला आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात स्थायिक झालेले किंवा काही वर्षांकरिता परदेशात गेलेले मराठीजन गणेशोत्सव उत्साहाने साजरा करतात. सध्या कोरोना संकट शिथिल झाले विन्घहर्ता श्री गणेशाची परदेशवारी अर्थात सातासमुद्रापारचा प्रवास सुरू झाला आहे. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरातील गणेशमूर्तीकार बाबासो कुंभार यांच्याकडील शाडूची इको फ्रेंडली नैसर्गिक रंगांनी रंगवलेली महागणपतीची मूर्ती विमानाने जर्मनीला रवाना होणार असल्याचे मूर्तीकार बाबासो कुंभार यांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. त्यात तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने गणेशोत्सवात अधिक काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश शासनाने दिल्याने कुंभार समाजातील गणेशमुर्तीकारांना मोठा फटका बसला आहे.

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे ४० वर्षापासून वडिलोपार्जित कुंभार व्यवसाय करणारे बाबासो कुंभार यांचा आकर्षक गणेशमूर्ती बनवण्यात हातकंडा आहे. त्यांनी बनवलेल्या मुर्तींना महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या अनेक गावांमध्ये मोठी मागणी असते. चालू वर्षी गणेशोत्सवासाठी बाबासोंनी तयार केलेली महागणपतीची एक फुटी मूर्ती चक्क जर्मनीला रवाना होणार आहे. या गोष्टीमुळे कुरुंदवाड गावचे नावलौकिक झाले आहे.

शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथील अनिल वसंत खोत हे जर्मनीतील पोक्स व्यंगण या कंपनीत कार्यरत आहेत. त्यांनी कुरुंदवाड येथील बाबासो कुंभार यांच्याकडे महागणपतीची मूर्ती बनवण्यासाठी ऑर्डर दिली आहे. जर्मनी येथे स्थायिक असलेले सुनील खोत यांच्या पत्नी अनिता खोत यांचे माहेर कुरुंदवाड येथील भैरववाडी आहे. सध्या त्या शिरोळ येथेच आहेत. हा बाप्पा थर्माकॉलच्या बॉक्समधून अगदी सावधानता बाळगुन विमानाने पुणे येथुन दिल्ली आणि दिल्लीतून जर्मनी येथे रवाना होणार आहे. जर्मनीत रवाना होण्यासाठी हा बाप्पा सुमारे १४ तासांचा प्रवास करणार आहे. यंदाचा गणेशोत्सव हा १० सप्टेंबर रोजी प्रारंभ होत आहे. आपली गणेशमूर्ती परदेशात जाणार असल्याने मूर्तीकार बाबासो कुंभार व त्याचा मुलगा, मुलगी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Stories

अधिकाऱयाला दमदाटी केल्याबद्दल गडहिंग्लज नगरपरिषदेचे काम बंद

Patil_p

20 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होणार?

datta jadhav

मुंबईत चार मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती

Archana Banage

मुख्यमंत्री शिंदेंचा उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; ‘मेट्रो’चं कारशेड आरेमध्येच होणार

Abhijeet Khandekar

राधानगरी तालुक्यात साकारतोय ऊस उत्पादन वाढीचा प्रयोग

Archana Banage

“जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे”; मनसेची शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी

datta jadhav