Tarun Bharat

कुरुंदवाडच्या क्रीडाक्षेत्रात एक मानाचा तुरा.

Advertisements

प्रतिनिधी / कुरुंदवाड :

गुवाहाटी, आसाम येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत कुरुंदवाडच्या अनिरुद्ध निपाने व अनन्या पाटीलच्या पाठोपाठ हर्कयुलस जिमची खेळाडू स्नेहल सुकुमार भोंगाळे हिने 21 वर्षाखालील वेटलिफ्टिंग स्पर्धेत +87 किलो वजनी गटात भाग घेऊन सुवर्णपदक पटकावले. यामुळे कुरुंदवाडच्या क्रीडाक्षेत्रात एक मानाचा तुरा रोवला आहे. यापूर्वी अनिरुद्ध निपाने आणि अनन्या पाटील यांनी वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले होते, तर त्यांच्यापाठोपाठ स्नेहल भोंगाळे हिने हे सुवर्ण स्नॅचमध्ये 65 किलो आणि क्लीन अॅन्ड जर्कमध्ये 93 असे एकूण 158 किलो उचलून जिंकले. तिला हरक्युलस जिमचे प्रशिक्षक प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

आमच्या खेळाडूने मिळवलेले सुवर्ण यश हे कौतुकास्पद असून गेल्या दोन वेळापेक्षा यावेळची खेलो इंडिया खेलो स्पर्धा अत्यंत दर्जात्मक असून संघर्षमय खेळातून हे यश संपादन केले आहे. कुरुंदवाड सारख्या ग्रामीण भागातून येऊन आपली चमक दाखवणे आणि आपल्या शहराचे नाव उज्वल करणे अत्यंत गौरवास्पद आहे. यापुढेही विविध स्पर्धांमध्ये पूर्वीप्रमाणे सुयश संपादन करण्यासाठी आम्ही खेळाडूंकडून जीवतोड मेहनत करून घेत असून, पुढील काळातील निश्चित सुवर्ण यश मिळेल अशी मला आशा आहे. असे मनोगत मार्गदर्शक प्रदीप पाटील यांनी व्यक्त केले.

Related Stories

गारगोटी -पिंपळगाव रस्त्यानजीक टस्कराचा धुडगूस

Abhijeet Shinde

इचलकरंजी येथील सव्वा तीन कोटीच्या अपहार प्रकरणी एकास अटक

Abhijeet Shinde

भूईबावडा घाटरस्त्याला पडली भेग

Abhijeet Shinde

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

Abhijeet Shinde

भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व जिल्हाध्यक्ष घाटगे यांच्या पाठीशी

Abhijeet Shinde

डॉ. प्रणोती संकपाळ हिचे UPSC परीक्षेत यश

Abhijeet Shinde
error: Content is protected !!