Tarun Bharat

कुरुंदवाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisements

प्रतिनिधी / कुरुंदवाड

सरकारच्या कर्ज माफीच्या चुकीच्या धोरणामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. त्याचे निषेधार्थ कुरुंदवाड शेतकरी संघर्ष समन्वयक कुरुंदवाडने आज कुरुंदवाड बंदची हाक दिली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कुरुंदवाडमधील प्रमुख चौकांतून मोर्चा काढण्यात आला.

हा मोर्चा कुरुंदवाडमधील प्रमुख चौकांतुन नगरपालिका चौकात आला. यावेळी उदय डांगे, आण्णासो चौगुले, बाबासो पट्टेकर, राजेंद्र पोमाजे याची मनोगते झाली. यावेळी सर्व व्यापारी दुकानदार हॉटेल मालक हातगाडी मालक यांनी पाठिंबा देऊन कडकडीत बंद पाळण्यात आला.

यावेळी संजय चौगुले, बाळासाहेब ठोंबरे, दत्तात्रेय गुरुव, बाळासो गायकवाड, बाबासो पट्टेकरी, योगेश जिवाजे, बंडू उंमडाळे, पिंटू औरवाडे, महावीर चिंचवाडी, महावीर बलवान, राजेंद्र पोमाजे, आप्पासो लांडगे, शिवाजी रोड़े, दत्तात्रेय चव्हाण, चंद्रकांत गवळी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

कळंबा महालक्ष्मी यात्रा उत्साहात पार; दै. तरुण भारत विशेष अंकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Abhijeet Shinde

प्राथमिक दूध संस्था नोंदणीचा धडाका

Abhijeet Shinde

कोल्हापूर शहरात उष्मा वाढला; पावसाच्या सरी कोसळल्या

Abhijeet Shinde

यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे 22 जानेवारीला अनावरण

Abhijeet Shinde

राधानगरी प्रांत प्रसेनजीत प्रधान लाचलुचपतच्या जाळ्यात

Abhijeet Shinde

Sangli; नवजात बाळाच्या खूनप्रकरणी मातेस जन्मठेप

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!