Tarun Bharat

कुरुंदवाड येथे खासदार संजय राऊत यांचा निषेध

प्रतिनिधी / कुरुंदवाड

                     साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपती महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या खासदार संजय राऊत यांचा येथील भारतीय जनता पार्टी व शहर कृती समितीच्यावतीने कुरुंदवाड येथील शिवाजी पुतळ्याजवळ निषेध करण्यात आला राऊत यांचे गाढवावर बसलेल्या पोस्टरला जोडे मारून दहन करण्यात आले.

             यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष व भाजपचे नेते रामचंद्र डांगे म्हणाले की, उदयनराजे हे शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आहेत. हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. संजय राऊत यांनी त्यांच्याकडे पुरावे मागणे हे निंदनीय आहे. संजय राऊत यांची स्मृती भ्रष्ट झाली असल्याने त्यांचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे. यावेळी सिताराम भोसले, दयानंद मालवेकर, महीपती बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी भारतीय जनता पक्ष व शहर कृती समितीच्यावतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला.

                    यावेळी संजय राऊत यांचा व महाराष्ट्रकर्नाटक सीमेवरील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यास गेलेले राज्याचे आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटीलयड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या वर्तणुकीचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, अविनाश मुंगसे, युवराज खरात यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता.

            यावेळी नगरसेवक उदय डांगे, महेश निकम, सचिन भोसले, आयुब पठाण, चांद कुरणे, राजेंद्र फल्ले, राजू पाटील, बाळासाहेब बेले, केदार पाटुकले, नंदू पाटील, ओंकार माळी, चेतन चौगुले, अनिल शिकलगार, यासह भारतीय जनता पक्ष व कृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

Related Stories

संदीप देसाई ! राष्ट्रवादीतून पुन्हा भाजपमध्ये…

Archana Banage

रिडिंगप्रमाणे बिले घ्या अन्यथा बिले भरणार नाही, महावितरणला सांगरुळ परिसरातील शेतकऱ्यांचा इशारा

Archana Banage

कसबा सांगावात खुटवडा वेल खाल्याने आठ शेळ्यांचा मृत्यु

Archana Banage

आवळीतील विवाहीतेचा प्रियकरानेच केला खून

Archana Banage

शिरोळ तालुका पूरग्रस्तांच्या आढावा बैठकीत गोंधळ

Archana Banage

भटक्या कुत्र्यांना अँटी रेबीजचा डोस

Archana Banage