Tarun Bharat

कुरुंदवाड शहरात वीज बिल माफीसाठी बोंब ठोकून आंदोलन

Advertisements

प्रतिनिधी / कुरुंदवाड


कोरोना कालावधीतील वीज बिल माफ करावे. या मागणीसाठी कुरुंदवाड शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी येथील महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून बोंब ठोकून आंदोलन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी जमावाला पोलिसांनी रोखून धरले या आंदोलनप्रसंगी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी बोलताना विश्वास बालिघाटे म्हणाले, लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, अचानक नामदार राऊत यांनी वीज बिल माफ होणार नाही असे सांगितल्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. लॉकडाऊन काळात कोणाच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे शासनाकडून विज बिल जोपर्यंत माफ होत नाही तोपर्यंत हा आंदोलनाचा लढा तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी दिला. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयासमोर बोंबठोक आंदोलन करत वीज बिलांची होळी केली व सरकारचा निषेध केला.

यावेळी रघु नाईक, योगेश जिवाजे, बंडु उमडाळे,अविनाश गुदले, दीपक पोमाजे,अमर कुंभार,बंडु कुंभार,बंडु पाटील,नितीन यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

संजय राऊत, खडसे यांचे समाजकंटक असल्याच्या बहाण्याने फोन टॅप : पोलीस

Abhijeet Shinde

दोन्ही हुतात्मा वीर सुपुत्रांना प्रत्येकी एक कोटी देणार : पालकमंत्री सतेज पाटील

Abhijeet Shinde

सोलापूर : उपरी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Abhijeet Shinde

पश्चिम महाराष्ट्रात येत्या शनिवारी कानडी व्यवहार बंद

Abhijeet Shinde

शाहूवाडी तालुक्यात खरीप पेरण्या पुर्ण; बळीराजा मान्सूनच्या प्रतीक्षेत

Abhijeet Shinde

इचलकरंजीतील बेपत्ता यंत्रमाग उद्योजकाचा मृतदेह आढळला पंचगंगेत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!