प्रतिनिधी / कुरुंदवाड
जयसिंगपूर शिरोळ पाठोपाठ कुरुंदवाड मध्ये कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्ण आढळले यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.
कुरुंदवाड मध्ये सापडलेले कोरोना रुग्ण हे हैदराबाद वरून आलेले होते त्यांना तपासणीसाठी शिरोळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीग्रह येथे अलगीकरण क् केंद्रात ठेवण्यात आले होते यामधील एक महिला आणि मुलगी यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून संबंधित महिलेच्या पतीचा रिपोर्ट प्रलंबित आहे अशी माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.
दरम्यान पूर्ण वाढ शहरातील दोन व्यक्ती कोरुना बाधित सापडल्यामुळे शहरात पुन्हा कडक लॉक डाउन करावे अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.


previous post