Tarun Bharat

कुरूंदवाड : सुधारित नळ पाणीपुरवठा करणार्‍या कंपनीचा ठेका रद्द

Advertisements

प्रतिनिधी/कुरुंदवाड

गेले दोन ते अडीच वर्षे रखडलेल्या कुरूंदवाड शहराच्या सुधारित आणि महत्त्वकांक्षी नळ पाणीपुरवठा योजनेचा पुणे येथील विस्टा कोअर कंपनीला दिलेला ठेका अखेर रद्द करण्यात आला. पालिकेच्या आजच्या विशेष सभेत बहुमताने हा निर्णय घेण्यात आला. शहराच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेच्या ठेक्याच्या निर्णयाबाबत आज पालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते. तर उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, मुख्याधिकारी निखिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

या विशेष सभेला पालिका सभागृहात आज सकाळी साडेअकरा वाजता सुरुवात झाली. प्रारंभी विषय पत्रिकेचे वाचन नामदेव धांतूडे यांनी केले. यानंतर नगरसेवक फारुख जमादार, जवाहर पाटील, सुनील चव्हाण आदींनी ठेकेदारांनी गेल्या अडीच वर्षात कोणतेच काम केले नाही तरी त्याचा ठेका रद्द करावा अशी मागणी लावून धरली. यानंतर विरोधी गटाच्या नगरसेवकांनी या मागणीला आक्षेप घेत विरोधी पक्षनेते रामचंद्र डांगे, सिमरन गरगरे, अनुप माद्याळे यांनी ठेकेदाराची काम करताना नगरपालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी अडवणूक केल्याचा आरोप करत त्यांना एक वर्षाची मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली. यानंतर सत्ताधारी व विरोधी नगरसेवक जोरदार वादावादी झाली. तर नगराध्यक्ष जयराम पाटील आणि विरोधी पक्ष नेते रामचंद्र डांगे यांच्या त काहीवेळ शाब्दिक चकमक उडाली. अखेर नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी याबाबत मतदान घेण्याचा निर्णय घेतला.

यावर मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी संबंधित ठेकेदार कोणत्याही बैठकीला हजर राहत नव्हता व कामही वेळेत करत नव्हता याबाबत नगराध्यक्ष आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे आपण अहवाल पाठवला होता व या ठेकेदाराला बाबत सभेने ठोस निर्णय घ्यावा कळवले होते असे स्पष्टीकरण केले. त्यानंतर नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी हा पाणीपुरवठ्याचा विस्टा कोअर कंपनीला दिलेल्या ठेका रद्द करावा याबाबत मतदान घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी ठेका रद्द करण्याबाबत च्या बाजूने बारा नगरसेवकांनी मतदान केले.

या विशेष सभेला सुजाता मालवेकर व जरीना गोलंदाज या दोन नगरसेवक वगळता सर्व नगरसेवक उपस्थित होते तसेच पालिका प्रशासकीय विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते. दरम्यान ठेका रद्दच्या निर्णयामुळे विरोधी भाजप आघाडीचा ठेकेदारास मुदतवाढ देण्याचा मनसुबा धुळीस मिळाला

Related Stories

सीपीआर,गडहिंग्लज रुग्णालयात अत्याधुनिक बालरोग कक्ष

Sumit Tambekar

अखेर वानरांची झाली सुटका; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, वनविभाग,प्राणीमित्रांचे शर्थीचे प्रयत्न

Abhijeet Khandekar

करवंदे खाणे आहे इतके फायदेशीर…

Rahul Gadkar

दिल्लीवरून कोल्हापूरमध्ये विमानाने आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कोल्हापूर : डीकेटीईच्या ५० विद्यार्थ्यांची आंतराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड

Abhijeet Shinde

…तर दोन्ही मंत्र्यांना पाच नद्यांच्या पाण्याने अंघोळ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!