Tarun Bharat

कुर्डुवाडीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल स्क्रिनिंग चाचणी

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व नागरिकांचे थर्मल स्क्रिनींग करण्याचे काम ग्रामीण रूग्णालय व नगरपालिका संयुक्तिकरित्या हाती घेतले असून त्याची सुरुवात प्रभाग क्र.३ पासून झाली असून दुपारपर्यंत ७६१ नागरिकांची थर्मल स्क्रिनिंगची चाचणी झाली आहे. शहरात अशा प्रकारच्या तीन टीम सध्या कार्यरत असून संपूर्ण शहराची तपासणी या टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

या टिम मध्ये वैद्यकीय अधिकारी डॅा. संतोष अडागळे, डॅा. गिरीष गव्हाणे, ए.एन.एम.आवताडे, ए.एन,फार्मासिस्ट गणेश कवडे, एक्सरे टेक्निशिअन गोविंद शिंदे, चालक एस.एम.पडवळ तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास गावडे, आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण, प्रवीण देवडकर, अतुल शिंदे, सागर बागल, किरण खवळे आदींसह प्रभागातील नगरसेविका वनिता सातव, संभाजी सातव व स्वयंसेवक सचिन दीक्षित हे होते.

Related Stories

सातारा शहर अंधारात

Patil_p

सुप्रसिध्द दिग्दर्शक पद्मभूषण गुलजार चिरमुले पुरस्काराने सन्मानित

Patil_p

महा‘टुचुक’मध्ये जिल्हय़ात उच्चांकी लसीकरण

Patil_p

मराठा आरक्षण रद्दचा निर्णय समाजासाठी दुर्दैवी- आ. शिवेंद्रसिंहराजे

Patil_p

वर्दीवरील बूट काढताहेत पोलिसांचा घाम

Patil_p

महाराष्ट्रातील कोरोना : मागील 24 तासात 8,129 नवे रुग्ण; 200 मृत्यू

Tousif Mujawar