Tarun Bharat

कुर्डुवाडी : किराणा व्यापाऱ्यावरील गोळीबार प्रकरणी ४ जणांना पिस्तूलासह अटक

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

येथील टेंभुर्णी रोडवरील ढवळसकर फर्मचे मालक प्रवीण ढवळसकर मंगळवार दि.२३ जून रोजी आपले दुकान बंद करुन आपल्या भावासमवेत मोटारसायकलवरुन घराकडे जात असताना रस्त्यामध्ये दब धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी देशमुख हॉस्पिटलसमोर त्यांची गाडी अडवून त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून नेत मोटारसायकलवरील प्रवीण ढवळसकर याच्यावर गोळीबार करुन जखमी कले होते. यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ही घटना घडून अडीच- तीन आठवडे पूर्ण होत असताना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास या प्रकरणातील संशयित आरोपींना कुर्डुवाडी बायपास रोडवर पिस्तुलसह सोलापुर येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या संशयित आरोपींमध्ये भैया लेंगरे (वय-३३,रा कुर्डुवाडी ता. माढा), सुरज भोसले(वय-३२,रा. कुर्डू ता. माढा), गणेश गायकवाड (वय३०, रा. कुर्डू ता. माढा) व गणेश कापरे (वय३०,रा. कुर्डू ता. माढा) यांचा समावेश आहे.

Related Stories

शालेय शिक्षणासोबत व्यक्तिमत्व विकास गरजेचा

prashant_c

नवाब मलिकांचा जामीन अर्ज फेटाळला

Archana Banage

सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी शमा पवार यांची नियुक्ती

Archana Banage

“गाल सर्वांनाच रंगवता येतात,” रुपाली चाकणकरांच्या ‘त्या’ टीकेला दरेकरांनी दिलं उत्तर

Archana Banage

अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक

Archana Banage

‘भाजपच्या दडपशाहीसमोर झुकणार नाही’; काँग्रेसचा उद्या ईडी कार्यालयावर मोर्चा

Archana Banage