प्रतिनिधी / कुर्डुवाडी
भोसरे ता. माढा येथील आणखी दोघे जण कोरोनाबाधित असल्याचा तपासणी अहवाल गुरूवारी प्राप्त झाला असून हे दोन्ही बाधित रुग्ण बाधित रुग्णाच्या संपर्कातील असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत पलंगे यांनी दिली.
भोसरे येथील पहिला रुग्ण दि २ रोजी गुरुवारी रात्री कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल आला त्यानंतर त्यारुग्णाच्या राहता परिसर सुमारे ५०० मीटर कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आणि अतिसंपर्कातील लोकांना जागेवर क्वारंटाइन करुन स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी एका तरुणाचा अहवाल मंगळवारी पॉझिटीव्ह असा आला तर आज गुरुवारी तब्बल सात दिवसानंतर पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील आणखी दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यापैकी एक पुरुष व एक स्त्री आहे.
त्यामुळे भोसरे परिसरात कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ४ झाली आहे.येथील परिसर आधिपासूनच प्रतिबंधीत केलेला आहे. यापूर्वी माढा तालुक्यातील भोसरे, आकुंभे,रिधोरे येथील २२ व आज नव्याने घेण्यात आलेले दगड अकोले येथील ६ असे एकूण २८ स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे.


previous post