Tarun Bharat

कुर्डू येथे विवाहीतेची आत्महत्या

Advertisements

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

विवाहाला अवघे २२ महिने झाले नाही तोच पती व सासरा यांनी विवाहीतेला माहेरी जाऊ नये व माहेरच्या लोकांशी संपर्क करु नये यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. सततच्या त्रासाला कंटाळून २२ वर्षीय विवाहीतेने राजाभाऊ पाटील यांच्या विहीरीत उडी मारून आत्महत्या केली.


ही घटना कुर्डू ता. माढा येथे रविवार दि.१३ रोजी सायं ७.२० मि.पूर्वी घडली. याबाबत बाबासाहेब भालचंद्र पाटील रा. अरण ता.माढा यांच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत मयत विवाहीतेचे पती श्रीकांत राजाभाऊ पाटील व सासरे राजाभाऊ पाटील रा.कुर्डू यंच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.स्वाती श्रीकांत पाटील वय २२ असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे व सहा.पो.निरीक्षक विक्रांत बोधे यांनी भेट दिली.सदर आरोपींना काल सायंकाळी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक किरण भालेकर हे करीत आहेत.

Related Stories

अकलूज परिसरात तुफान पाऊस

Abhijeet Shinde

 हिंगणघाट प्रकरण : हैद्रराबादसारखं काही तरी करा : प्रणिती शिंदे

prashant_c

सोलापूर : बोगस डॉक्टरने घरोघरी पोहोचवला कोरोना, बार्शीत गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

रुग्णालयांनीच कोरोना रुग्णांना रेमडीसिवर उपलब्ध करून द्यावेत : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त व नियोजन बद्ध शेती करावी – डॉ. कसपटे

Abhijeet Shinde

महागाई व ईडीच्या विरोधात अक्कलकोटमध्ये काँग्रेसकडून निषेध..

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!