Tarun Bharat

कुलगाममध्ये 8 तास चकमक; मध्यरात्री 2 दहशतवाद्यांचा खात्मा

Advertisements

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील हसनपोरा भागात आठ तास चाललेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी हसनपोरा गावात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी संयुक्तपणे संध्याकाळी या भागाला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. खराब हवामान आणि अंधारामुळे गावात येण्या-जाण्यासाठी सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. दरम्यान, मध्यरात्री एकच्या सुमारास सुरक्षा दलांचा वेढा तोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेले दोन दहशतवादी गोळीबारात ठार झाले. लोकवस्तीचा भाग असल्याने सुरक्षा दल खबरदारी घेत होते.

या वर्षातील ही आठवी चकमक आहे. नववर्षात आतापर्यंत 13 दहशतवादी ठार झाले आहेत. त्यापैकी बहुतेक जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाचे सर्वोच्च कमांडर आहेत.

Related Stories

अनलॉक 2 : उत्तराखंडमध्ये कोरोनाचे रिपोर्ट निगेटीव्ह असलेल्या पर्यटकांना फिरण्यास परवानगी

Rohan_P

पॅरोलवरील राम रहीमचा ऑनलाईन सत्संग

Amit Kulkarni

भाजपच्या पोल खोल सभेचा स्टेज शिवसैनिकांकडून उद्ध्वस्त

datta jadhav

अटकेतील तृणमूल आमदार रुग्णालयात

Patil_p

डोवालांच्या बंगल्यात घुसखोरीचा प्रयत्न

Patil_p

लवादांमधील नियुक्त्यांकरता 2 आठवडय़ांची मुदत

Patil_p
error: Content is protected !!