Tarun Bharat

कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. 

कुलगाम जिल्ह्यातील चिंगम परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दल आणि जम्मू पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान, एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना सरेंडर करण्यास सांगण्यात आले. मात्र, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. 

जवानांनी दहशतवाद्यांकडील एम-4 रायफल आणि एक पिस्तुल हस्तगत केले आहे. तसेच चिंगम परिसरात जवानांकडून शोधमोहीम राबवली जात आहे.

Related Stories

गाझीपूर फुल मार्केटमध्ये सापडली स्फोटकांनी भरलेली बॅग

datta jadhav

फाइजर-बायोटेकचे दोन डोस घेतल्यानंतर ही कोरोना धोका कायम

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रात खिरापत अन् पंजाबमध्ये टाच

datta jadhav

गरोदर महिलेसाठी 100 सैनिक ठरले देवदूत

Patil_p

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची भरदिवसा हत्या

Patil_p

मुंबई पोलिसांकडून 2,200 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त

Tousif Mujawar