Tarun Bharat

कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील चिम्मर परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. 

चिम्मर परिसरात दहशतवादी लपल्याची  माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने या परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला सुरक्षा दलाचे जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत. दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले असून, शोधमोहीम सुरू आहे.

Related Stories

भोपाळमध्ये दोन तासात तीन इंच पाऊस

Patil_p

शिंजो आबे यांच्या हत्या प्रकरण : जपानच्या मंत्र्याचा राजीनामा

Abhijeet Khandekar

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची ‘बुलेट’ सवारी…

Archana Banage

कोरोनावरील भारतीय लस 2021 च्या प्रारंभी

Patil_p

खासगी’त 250 रुपयात लस

Amit Kulkarni

आप कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकल्याचा दावा

Patil_p