Tarun Bharat

कुलगाम चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील नागनाज चिम्मेर परिसरात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. या कारवाईत 3 भारतीय जवान जखमी झाले आहेत.

नागनाज चिम्मेर परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दल आणि जम्मू- काश्मीर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान, दहशतवाद्यांनी लष्करी जवान आणि पोलिसांवर गोळीबार केला. भारतीय लष्कर आणि पोलिसांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीत लष्कराचे तीन जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या भागात जवान आणि पोलिसांनी वेढा दिला असून, शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी कुपवाडामधील केरन सेक्टमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याचा जवानांनी खात्मा केला. 

Related Stories

पूल टेस्टिंगला अनुमती, अत्यंत कमी खर्च

Patil_p

ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी शाहरुखकडे 25 कोटींची मागणी

datta jadhav

मध्यप्रदेशात 2 आदिवासींचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू

Patil_p

ही मोर्चे काढण्याची वेळ नाही: खासदार संभाजीराजेंचा पुनरुच्चार

Archana Banage

‘बीएसएफ’ने उधळला शस्त्र तस्करीचा प्रयत्न

Patil_p

“भाजपला नवीन ४० भोंगे मिळालेत, त्यांना…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

Archana Banage